मुंबई, ठाणे, रायगडला मोठा धोका, प्रशासनाकडून अलर्ट जारी, थेट इशारा, 18 मे पर्यंत..

गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल होत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यातील काही जिल्हे संकटात आहेत. प्रशासनाने नागरिकांकरिता अलर्ट जारी केला आहे.

मुंबई, ठाणे, रायगडला मोठा धोका, प्रशासनाकडून अलर्ट जारी, थेट इशारा, 18 मे पर्यंत..
Warning
| Updated on: May 15, 2026 | 1:00 PM

उद्यापासून मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाचा (IMD) यलो अलर्ट जारी केला. मुंबईत तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ठाण्यात काही भागांत तापमान 38 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. शुक्रवार आणि शनिवार रायगड-ठाण्यात उष्णतेची तीव्रता अधिक राहणार आहे. गेल्या आठवड्यातही मुंबई महानगर क्षेत्रात तीव्र उकाड्याची नोंद झाली. बुधवारी तापमान 34 अंशांवर आल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आज शुक्रवारपासून पुन्हा तापमान वाढण्याचा अंदाज आहे. 18 मेनंतर ठाण्यात हलक्या पावसासह मेघगर्जनेची शक्यता आहे. मुंबईत मात्र कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश राहण्याचा अंदाज. दुपारच्या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा असा थेट सल्ला भारतीय हवामान विभागाने दिलाय. बाहेर काम करणाऱ्यांनी पुरेसे पाणी प्या आणि वारंवार विश्रांती घ्या, असेही सांगण्यात आले.

मुंबईतील मे महिन्यातील उच्चांकी तापमान 12 मे 1979 रोजी 41 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. आता मुंबईच्या तापमानात वाढ होताना दिसत आहे. नंदुरबारमध्ये तापमान 41 अंशांवर स्थिर असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, आद्रता कमी असल्याने उकाडा कायम असून रस्त्यांवर सकाळपासून शुकशुकाट बघायला मिळतोय.

अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. उष्माघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायतमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे आदेश. देण्यात आले  नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा कहर कायम असतानाच, आता तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान 41 अंश सेल्सिअसवर स्थिर असून, यापूर्वी या आठवड्यात तापमानाचा पारा तब्बल 45 अंशांपर्यंत पोहोचला होता. तापमानात घट झाली असली तरी हवेत आद्रतेचे प्रमाण कमी असल्याने उकाडा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रातही रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून, नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमान 41 अंशांच्या आसपासच राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

बुलढाणा हे थंड हवेचे शहर म्हणून ओळखल्या जात होते. आतापर्यंत 38 ते 39 अंश सेल्सिअस राहत असलेले तापमान आता 43 अंशाच्या वर गेले आहे. त्यामुळे थंड हवेचे शहर म्हणून बुलढाणा शहराची असलेली ओळख आता पुसली जात आहे. याच वाढत्या तापमानाचा परिणाम हा मानवी आरोग्यसह पशु प्राणी आणि शेत पिकांवर देखील होताना दिसत आहे.. त्यामुळे गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे, बाहेर पडताना डोके आणि कानाला बांधून घ्यावे, शेतीची कामे करताना सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेतच करण्याचे नियोजन करावे, काळजी घेण्याचे आवाहन कृषी हवामान तज्ञांकडून करण्यात येत आहे.

Follow Us