संभाजीनगरनंतर धाराशिवचा वादही पेटणार, नामांतराच्या निषेधार्थ MIM आक्रमक, काय घडतंय?

| Updated on: Mar 07, 2023 | 11:11 AM

उस्मानाबादच्या नामांतरास विरोध असून नामांतर करण्यात येवू नये या मागणीसाठी आयएमआयएमच्या वतीने 8 मार्च रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

संभाजीनगरनंतर धाराशिवचा वादही पेटणार, नामांतराच्या निषेधार्थ MIM आक्रमक, काय घडतंय?
Follow us on

संतोष जाधव, धाराशिव : औरंगाबादनंतर (Aurangabad) आता उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे धाराशिव (Dharashiv) नामकरण केल्याचे प्रकरण पेटणार असल्याचे दिसत आहे. एमआयएमने 8 मार्चपासून साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. धाराशिव नाव केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर नंतर धाराशिव येथे MIM आमरण उपोषण करणार असल्याने नामांतरला पाठिंबा देणाऱ्या व विरोध करणाऱ्या संघटनांमध्ये वाद पेटणार आहे.

MIM चा आरोप काय?

उस्मानाबाद जिल्हा ऐतिहासिक जिल्हा असून या जिल्ह्याचे नाव धाराशिव ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक होते मात्र हरकती न मागविता न्यायालयीन प्रकरण असताना केवळ सत्तेच्या बळावर नामांतर केले आहे असा आरोप एमआयएमने केला आहे.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नुकतीच केंद्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर व उस्मानाबादचे धाराशिव नामांतरासाठी मंजुरी दिली आहे मात्र या नामांतराबाबत नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे होतेच शिवाय त्यांच्या हरकती व मते जाणून घेणे आवश्यक होते परंतू तसे न करता नागरीकांना विश्वासात न घेता व न्यायालयीन प्रकरण चालु असताना केवळ सत्ता हाती असल्यामुळे या नामांतरास मंजुरी दिल्यानंतर नागरीकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.

या नामांतराच्या मंजुरीस नागरिक म्हणून आम्ही एमआयएम पक्षाच्या वतीने विरोध दर्शवित आहोत, त्यामुळे उस्मानाबादच्या नामांतरास विरोध असून नामांतर करण्यात येवू नये या मागणीसाठी एआयएमआयएमच्या वतीने 8 मार्च रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून न्याय मागणार आहोत, असा इशारा एमआयएम पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

साखळी आंदोलनाला प्रतिसाद मिळणार?

या उपोषणास अनेकजणांचा सहभाग पाठिंबा राहणार असून याबाबत वरीष्ठांना कळवून आमच्या मागणीचा विचार करुन सहकार्य करावे अशी मागणी केली आहे. यावर एआयएमआयएमचे उस्मानाबाद शहराध्यक्ष सय्यद अजहर मुख्तार, जमीर खलील पठाण, माजीद जावेद शेख (जी.एम.), समीर हमीद शेख, पठाण नुरखॉन अमीनखॉन, अरबाज नदाफ, वसीम निचलकर, शहानवाज पटेल, आसेफ शेख, इर्शाद सय्यद, अतिक शेख, शेख सरफराज, शेख जैद, जावेद शेख, अल्ताफ शेख, नदाफ मझहर व शहबाज शेख यांच्या सह्या आहेत. या साखळी आंदोलनाला आतापर्यंत एकही राजकीय पक्षाने, संघटना यांनी पाठिंबा दिलेला नाही त्यामुळे याला कसा प्रतिसाद मिळतो याकडे पाहावे लागेल