AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : आयपीएलमधील मोठ्या टीमसाठी वाईट बातमी, सीजन सुरु होण्याआधीच मॅचविनर खेळाडूला दुखापत

IPL 2023 : आयपीएलचा 16 वा सीजन सुरु होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सच्या टीमला धक्का बसला आहे. आधीच ऋषभ पंत नसल्याने ही टीम बॅकफूटवर आहे. मागच्यावर्षाच्या अखेरीस ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला.

IPL 2023 : आयपीएलमधील मोठ्या टीमसाठी वाईट बातमी, सीजन सुरु होण्याआधीच मॅचविनर खेळाडूला दुखापत
IPL 2023
| Updated on: Mar 07, 2023 | 10:49 AM
Share

Delhi Capitals IPL 2023 : IPL चा 16 वा सीजन या महिन्यापासून सुरु होणार आहे. 31 मार्चला पहिला सामना होणार आहे. सीजन सुरु होण्याधीच दिल्ली कॅपिटल्स टीमच्या अडचणी वाढताना दिसतायत. मागच्या सीजनमध्ये ऋषभ पंतकडे टीमच नेतृत्व होतं. पण मागच्यावर्षाच्या अखेरीस ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. त्यामुळे यंदाच्या सीजनमध्ये तो खेळणार नाहीय. या दरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या एका मोठ्या मॅचविनर खेळाडूला दुखापत झालीय. हा खेळाडू आपल्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

मेडिकल टीमने काय सांगितलय?

सध्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टेस्ट सीरीज सुरु आहे. या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाला दुखापत झालीय. तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. या दुखापतीमुळे तो वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीय. दक्षिण आफ्रिकेच्या मेडिकल टीमने खबरदारी म्हणून नॉर्खियाल विश्रांती घ्यायला सांगितली आहे. एनरिक नॉर्खिया दुखापतीमधून सावरला नाही, तर दिल्ली कॅपिटल्सच टेन्शन वाढू शकतं.

दुसरा पर्याय काय?

प्रोटियाजचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाला पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला टेस्ट टीममधून वगळण्यात आलं, असं CSA ने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. 29 वर्षाच्या नॉर्खियाने सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये 5/36 आणि 1/48 विकेट घेतला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 87 धावांनी विजय मिळवला. एनरिक नॉर्खियाच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. आफ्रिककडे कगिसो रबाडा, गेराल्ड कोएत्जी, मार्को जॅनसेन आणि वियान मूल्डर हे वेगवान गोलंदाजांचे पर्याय उपलब्ध आहेत.

Follow Us
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan LIVE: राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक