मी हिंदी बोलणारच नाही, फक्त मराठीतच बोलणार… भाजपचा मंत्री नेमकं काय म्हणाला? चर्चा सुरू

अशोक उईके यांनी पत्रकारांशी बोलताना गंमतीमध्ये मी फक्त मराठीच बोलणार, हिंदी बोलणार नाही. मला हिंदी येत नाही, असं वक्तव्य केलं आहे, त्यांचं हे वक्तव्य आता चांगलंच चर्चेमध्ये आलं आहे. 

मी हिंदी बोलणारच नाही, फक्त मराठीतच बोलणार... भाजपचा मंत्री नेमकं काय म्हणाला? चर्चा सुरू
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 28, 2025 | 3:54 PM

अजिक्य धायगुडे, प्रतिनिधी : राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे, याविरोधात येत्या पाच जुलै रोजी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू  उपस्थित राहणार आहेत. या मोर्चाला जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी आपला पाठिंबा दिला आहे, या मोर्चाकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.

याचदरम्यान आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी पत्रकारांशी बोलताना गंमतीमध्ये मी फक्त मराठीच बोलणार, हिंदी बोलणार नाही. मला हिंदी येत नाही, असं वक्तव्य केलं आहे, त्यांचं हे वक्तव्य आता चांगलंच चर्चेमध्ये आलं आहे.

नेमकं काय म्हणाले अशोक उईके? 

हिंदी मला येत नाही, मी हिंदी बोलणार नाही. मी फक्त मराठीत बोलणार, हिंदीत बोलणार नाही. माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला आहे, माझी आई शिकलेली नव्हती. माझ्या आईने मला मराठीत संस्कार दिले, त्यामुळे मी मराठीतच बोलणार असं उईके यांनी म्हटलं आहे, आता त्यांचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेमध्ये आलं आहे.

पाच जुलै रोजी मोर्चा  

राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून वातावरण चांगलंच तापलं आहे, याविरोधात येत्या पाच जुलै रोजी मुंबईमध्ये भव्य मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही सहभागी होणार आहेत, त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका अनेक पक्ष आणि संघटनांची आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये हा मोर्चा निघणार आहे.

मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा 

या मोर्चाला जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून या मोर्चाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक पत्रक जारी करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे वातावरण चांगलंच तापण्याचं चिन्ह आहे.