AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hasan Mushrif : माझ्या भविष्याच्या आड येऊ नका, मंत्री हसन मुश्रीफ यांना जवळच्या माणसाने सरळ सांगितलं, निवडणूक तिकीटावरुन निष्ठा क्षणात बदलली

Hasan Mushrif : राजकारणात तुमच्यासोबत कोण कितीही निष्ठावान असला तरी शेवटी एकाक्षणी निष्ठा बदलतेच. त्याचं कारण असतं राजकीय महत्वकाक्षा, निवडणुकीचं तिकीट. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबतीत सुद्धा असचं घडलय.

Hasan Mushrif : माझ्या भविष्याच्या आड येऊ नका, मंत्री हसन मुश्रीफ यांना जवळच्या माणसाने सरळ सांगितलं, निवडणूक तिकीटावरुन निष्ठा क्षणात बदलली
Hasan Mushrif
| Updated on: Oct 03, 2026 | 1:05 PM
Share

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी बंडखोरी होणार असं स्पष्ट दिसू लागलय. कारण तिकीट मिळणार नाही हे जसं-जसं स्पष्ट होऊ लागलय तस-तशी बंडखोरांची भूमिका समोर येतेय. काल भाजपच्या आल्हाद भांडारकर यांनी बंडाचे संकेत दिले. आज कोल्हापूरचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना त्यांच्या जवळच्या माणसाने काहीही करुन निवडणूक लढवणारच हे सांगितलं.आज प्रताप उर्फ भैया माने यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून माझ्या भविष्याच्या आड येऊ नका अशी विनंती केली. पुणे पदवीधर मतदार संघातून महायुतीकडून संधी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट होतात मंत्री हसन मुश्रीफ गटाचे प्रमुख प्रताप उर्फ भैया माने यांनी बंडाची भूमिका घेतली आहे.

आज त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून माझ्या भविष्याच्या आड येऊ नका अशी विनंती केली. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील भैय्या माने आणि आमचा संबंध संपला अशी भूमिका घेतली आहे. “मी गेले अनेक वर्ष या निवडणुकीसाठी इच्छुक आहे. मागील वेळी वरिष्ठांच्या सांगण्यावरून मी थांबलो होतो. मात्र मी कोणत्याही परिस्थितीत आता निवडणूक लढवणार अपक्ष म्हणून मी फॉर्म भरणार” असं भैय्या माने यांनी tv9 शी बोलताना सांगितला आहे.

भाजपची डोकेदुखी कोणी वाढवली?

दरम्यान अजित दादा असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती अशी भावना देखील भैया माने यांनी बोलून दाखवली आहे. काल संघाशी एकनिष्ठ असलेल्या आल्हाद भांडारकरांच्या यांनी नागपूर पदवीधरमधून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. आल्हाद भांडारकर हे शिक्षण महर्षी बापू साहेब लाखाणीकर यांचे नातू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अनेक दशकांपासून त्यांचा संबंध आहे. आल्हाद भांडारकर यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.काल आल्हाद भांडारकर यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली. पण उमेदवारी मिळण्याची निश्चिती नसल्याने 5 किंवा 6 तारखेला ते अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत.

Follow Us
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?