आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची जास्त खरेदी होत असल्यानेच.. प्रताप सरनाईक यांचे मोठे विधान, सोन्याच्या भावाबद्दल..

प्रताप सरनाईक यांनी जोरदार टीका संजय राऊत यांच्यावर केली. राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर उत्तर देताना सरनाईक हे दिसले. त्यांनी जोरदार निशाणा साधला. अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानावरही त्यांनी भाष्य केले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची जास्त खरेदी होत असल्यानेच.. प्रताप सरनाईक यांचे मोठे विधान, सोन्याच्या भावाबद्दल..
Minister Pratap Sarnaik
| Updated on: Nov 22, 2026 | 2:15 PM

प्रताप सरनाईक यांनी मोठे विधान केले. प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची जास्त खरेदी होत असल्यामुळे सोन्याच्या किंमती वाढत होत्या. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जवळपास 30 ते40 हजार रुपयांनी सोन्याच्या किंमती कमी झालेल्या आहेत. कालच पंतप्रधानांनी देशातील जनतेचे आभार व्यक्त केले की, मी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सोन्याची खरेदी केली नाही. जागतिक पातळीवर सोन्याच्या किंमती कमी झाल्यामुळे त्याचा फायदा आपल्या देशातील जनतेलाही होत आहे. काही गोष्टी अशा असतात की, ज्यावेळी पंतप्रधान जनतेला आवाहन करतात, त्यावेळी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन काही गोष्टी केल्या तर त्याची चांगली प्रचिती आपल्याला येताना दिसते. अशाच पद्धतीचे आवाहन कोरोना काळातही आदरणीय पंतप्रधानांनी केले होते आणि त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यास निश्चितच मदत झाली, हे आपण सगळे जाणतो.

पुढे प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, नोटाबंदीच्या काळातही अशाच प्रकारचे आवाहन करण्यात आले होते. त्याचाही फायदा जनतेला झाला आणि भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली. जागतिक पातळीवरही भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल अतिशय चांगले मत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक केलेले आहे.

Loading...

पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे मला वाटते. संजय राऊत यांच्यावरील टीकेवर बोलताना प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, बघा, संजय राऊतांना सकाळी उठल्या उठल्या काय बोलावं आणि कोणावर टीका करावी, हा प्रश्न पडलेला असतो. त्यांनी टार्गेटच ठरवलेलं असतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अमितभाई शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देशातील व राज्यातील इतर मोठ्या नेत्यांवर टीका करण्याची त्यांची सवय आहे.

संजय राऊत नेहमीच विरोधकांची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे बजावत असतात. कोणी चांगलं काम केलं तरी त्यांच्यावर टीका करायची, ही त्यांची प्रवृत्तीच आहे. संजय राऊत बोलले की, प्रत्येकी दीडशे कोटी रुपयांचा भाव सुरू आहे. संजय राऊतसुद्धा विरोधी पक्षातील सदस्य आहेत. त्यांना दीडशे कोटी रुपये मिळाले की नाही, हेही बघावं लागेल. मी नेहमीच म्हणत आलो आहे की, जणू काही RBI चे गव्हर्नर असल्यासारखे ते कोणाला दीडशे कोटी, कोणाला पन्नास कोटी, तर कोणाला शंभर कोटी रुपये मिळाले, असे सांगत असतात.

ज्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार स्थापन झालं, त्यावेळीसुद्धा पन्नास कोटींचे भाव असल्याची ते बोंबाबोंब करत होते, तरीसुद्धा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने पुन्हा एकदा आम्हाला सत्ता दिली. ज्या ज्या वेळी संजय राऊत अशा पद्धतीने खासदार आणि आमदारांवर आरोप करतात, त्या त्या वेळी देशात आणि राज्यात आमची सत्ता येते. त्यामुळे त्यांच्या आरोपांना किती लोक मान्यता देतात, हे त्यांच्या वक्तव्यांवरूनच स्पष्ट होतं.

दिवंगत नेते अजित पवार यांच्याविषयी चुकून बोलल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे. त्यामुळे या विषयावर आणखी पुढे जाणं योग्य नाही. कारण एखाद्या दिवंगत नेत्याबद्दल आदरांजली आणि श्रद्धांजली वाहणं हेच आपलं कर्तव्य असतं. त्यामुळे त्यांच्या विषयी आणखी काही बोलू नये, असं माझं मत आहे. टिपू सुलतान जयंतीबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, नाही, मला याबाबत काही कल्पना नाही. परंतु राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने चुकीच्या जयंत्या आणि पुण्यतिथी साजऱ्या करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us