AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा झटका बसणार? त्या आमदारांवर शिंदे गटाची नजर; बडा नेता म्हणाला, ऑपरेशन टायगर…

uday samant on thackeray group news : मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाबाबत धक्कादायक दावा केला. सामंत यांच्या वक्तव्याने उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढलं आहे.

सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा झटका बसणार? त्या आमदारांवर शिंदे गटाची नजर; बडा नेता म्हणाला, ऑपरेशन टायगर...
| Updated on: Jul 09, 2026 | 2:30 PM
Share

उद्धव ठाकरेंचे खासदार-आमदार फुटल्याने राज्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघालं आहे. ठाकरेंचे 6 खासदार आणि 1 आमदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागले. 7 लोकप्रतिनिधींनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांची ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आणखी काही आमदारांवर शिंदे गटाची नजर असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा झटका बसणार असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी दावा केला आहे. मंत्री उदय सामंत यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘शरद पवार हे देशातील राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. ते एकनाथ शिंदेंच्या दालनात आले असतील, तर त्यांचा सत्कार करणे ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे. काही लोक विसरलेली आहेत. त्या परंपरेनुसार एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचा सत्कार केला, यामागे कोणताही अर्थ लावू नये’.

शिंदेंच्या दालनात शरद पवारांच्या आमदारांची बैठक झाली. यावर मंत्री सामंत म्हणाले, ‘ही राजकीय संस्कृती आहे. शरद पवारांचे आमदार हे एकनाथ शिंदेना भेटल्याचे माहीत नाही. परंतु शिंदेंच्या दालनात भेटले असतील, तर यात वावगं काय आहे? त्यांची बैठक झाल्याने ते शिवसेनेत आले नाहीत, असं काही नाही. शिंदेंनी सत्कार केल्यानंतर पुन्हा कॅबिनेट बैठकीला निघून गेले. त्यामुळे राजकीय चर्चांमध्ये तथ्य नाही’.

मिसिंग लिंकवरून फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर राज ठाकरे म्हणाले, ‘त्यांनी नावे देखील सांगितली आहेत. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कसे राजकारण करतात, हे देखील त्यांनी सांगितले. त्यांनी खुलासा देखील केला आहे. 10 वर्षांनंतर हे टीका करणारे असतील की नसतील माहीत नाही. परंतु 10 वर्षांनंतर त्या मिसिंग लिंकवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव कायमस्वरुपी कोरलं जाईल. ते कोणी पुसू शकत नाही. नाना पटोले यांच्या सारख्या चांगल्या माणसांना दूर करून अशी माणसांना प्रदेशाध्यक्ष केले जाते. तेव्हा काँग्रेसचे अध:पतन निश्चित आहे.

उद्धव ठाकरे बैठका घेत आहेत. त्यावर सामंत म्हणाले, त्यांना उशिरा बैठका घेण्याची सवय आहे. त्यांनी काल घेतलेल्या बैठकीला काही आमदार गैरहजर असल्याचे ऐकलं आहे. मी दोन दिवस कोकणात होतो. त्यामुळे कोण कोणाच्या संपर्कात आहे, हे माहीत नाही. पण काही आमदार हे संपर्कात असू शकता. शिंदे गटात प्रवेश सुरू राहतील. ज्यांना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य आहे, ते शिवसेनेत येतच राहतील’.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा