AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Veg Nonveg Controversy: शाहाकारी- मांसाहारीवरुन वादाची फोडणी! भाजपला घेरलं, वाद पेटला, मीरा भाईंदरमध्ये काय घडलं?

मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा एकदा शाकाहार विरुद्ध मांसाहाराचा वाद पेटला आहे. यावेळी वादाचं कारण ठरलंय महानगरपालिकेच्या महासभेतील भोजन व्यवस्था.  गेल्या २५ वर्षांपासून महासभेत शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था होती,  मात्र गेल्या सहा महिन्यांपासून मांसाहारी जेवण वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे.

Veg Nonveg Controversy: शाहाकारी- मांसाहारीवरुन वादाची फोडणी! भाजपला घेरलं, वाद पेटला, मीरा भाईंदरमध्ये काय घडलं?
Mira Bhayandar news
| Updated on: Nov 24, 2026 | 2:31 PM
Share

Mira Bhaindar Veg Nonveg Controversy:  मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेतील मांसाहारी जेवण बंद करण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे.  भाजप सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात आता मराठी एकीकरण समितीसह शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसनेही भूमिका घेतली आहे. मीरा-भाईंदरला महाराष्ट्र म्हणायचं की जैन नगरी, असा सवाल मराठी एकीकरण समितीने केला आहे  तर आगरी-कोळी समाजाच्या खाद्यसंस्कृतीचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिलाय. दुसरीकडे बहुमताच्या जोरावर खाद्यस्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही, असं म्हणत काँग्रेसने संविधानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. नेमकं काय घडलं? वाचा….

 मीरा भाईंदरमध्ये शाहाकारी- मांसाहारी वाद पेटला!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा एकदा शाकाहार विरुद्ध मांसाहाराचा वाद पेटला आहे. यावेळी वादाचं कारण ठरलंय महानगरपालिकेच्या महासभेतील भोजन व्यवस्था.  गेल्या २५ वर्षांपासून महासभेत शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था होती,  मात्र गेल्या सहा महिन्यांपासून मांसाहारी जेवण वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे. यावरून आता विरोधकांनी भाजप सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

मराठा एकीकरण समिती, मनसेने भाजपला घेरलं! 

मीरा-भाईंदरला महाराष्ट्र म्हणायचं की गुजरात की जैन नगरी, असा सवाल करत मराठा एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. महापौर डिंपल मेहता यांच्या कार्यकाळात मांसाहारी भोजन बंद झाल्याचा आरोप करत ५५ मराठी नगरसेवक या निर्णयाविरोधात आवाज का उठवत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. महासभेत मांसाहारी जेवणाची व्यवस्था पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे,  मांसाहार हा केवळ जेवणाचा विषय नसून आगरी-कोळी समाजाच्या परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका  शर्मिला बगाजी यांनी म्हटले आहे. शेती, मासेमारी आणि स्थानिक व्यवसायांमध्ये आगरी-कोळी समाजाचं मोठं योगदान असतानाही निर्णय घेताना समाजाला विश्वासात घेतलं जात नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

काँग्रेसचेही टीकास्त्र!

दुसरीकडे काँग्रेसचे नेते मुजफ्फर हुसेन यांनी या वादाला संविधान आणि लोकशाहीची जोड दिली आहे. बहुमताच्या जोरावर मनमानी निर्णय घेता येत नाहीत,  काय खावं, काय परिधान करावं, कोणती भाषा बोलावी आणि कोणत्या धर्माचं पालन करावं, याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलंय, असं त्यांनी म्हटले आहे संविधानाची शपथ घेऊन सत्तेत आलेल्यांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांचा आदर करावा, असं सांगत त्यांनी भाजपवर संविधानविरोधी असल्याची टीका केली आहे. अशातच  मनसेचे सचिन पोपळे यांनी मराठी नगरसेवकांना ‘रोबोट नगरसेवक’ म्हणत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि खाद्यपरंपरेच्या मुद्द्यावर नगरसेवकांनी ठाम भूमिका घ्यावी, असं आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, या संपूर्ण वादावर भाजपकडून उपमहापौर ध्रुव किशोर पाटील यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत.  महासभेतील जेवणाची व्यवस्था करणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे… मात्र कोणाच्या तरी सांगण्यावरून भाजपला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मांसाहारी जेवणावर प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत बंदी घालण्यात आलेली नाही, तर हा निर्णय प्रशासनाच्या स्तरावर घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. नगरसेवकांमधील वातावरण जाणीवपूर्वक बिघडवण्यासाठी कोणीतरी सुपारी घेऊन काम करत असल्याचा गंभीर आरोपही ध्रुव किशोर पाटील यांनी केला आहे.

Follow Us
आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये...
Onion Price Crash : आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके...
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात....
Manoj Jarange Case : मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात; पेन ड्राइव्हमधील पुराव्याने खळबळ
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
Parinay Fuke : रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!
रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक....
Pratap Sarnaik : रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक; प्रताप सरनाईकांचं बंद मागे घेण्याचं आवाहन
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर.
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर निशाणा!
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चा...
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज?