अजूनही आशा, ‘कॅबिनेट’चा शब्द आहे, 5 ऑक्टोबरकडे लक्ष, बच्चू कडू म्हणतात, मी कडूच!

एकनाथ शिंदेंनी कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिलाय. त्यामुळे राज्यमंत्रीपदावर बोळवण होणार नाही, अशी इच्छा बच्चू कडूंनी व्यक्त केली.

मंजिरी धर्माधिकारी

|

Sep 22, 2022 | 5:35 PM

दत्ता कनवटे, औरंगाबादः  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणीवस (Devendra Fadanvis) यांचं पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ झालं. मात्र यात अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळालं नाही. त्यानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी बऱ्याच वेळा नाराजी दर्शवली. आता मात्र पुढील टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडून आपल्याला आशा आहे, अशी भावना त्यांनी टीव्ही9 कडे व्यक्त केली. एकनाथ शिंदेंनी कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिलाय. त्यामुळे राज्यमंत्रीपदावर बोळवण होणार नाही, अशी इच्छा बच्चू कडूंनी व्यक्त केली. माझ्या चेहऱ्यावर नाराजी दिसू शकते. कारण माझं आडनावच बच्चू कडू आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय . उस्मानाबादमध्ये अपंग बांधवांसाठीचा 5 टक्के निधी खर्च केला जात नव्हता. त्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यात बाचाबाची झाली. त्यानंतर बच्चू कडूंविरोधात 353 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या खटल्यासंदर्भात आज ते औरंगाबाद येथे आले होते. यावेळी त्यांनी टीव्ही9 प्रतिनिधींशी दिलखुलास बातचित केली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें