आधी काजू, बदामावर ताव; अन् आता दुष्काळ निवारणाच्या बैठकीत आमदाराचा जेवणावर ताव? काँग्रेस नेत्याने पोस्ट केला Video

महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यांपासून पाऊसच झालेला नाहीये, त्यामुळे यंदा राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून आढावा बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभू्मीवर आता एक व्हिडीओ समोर आला आहे.

आधी काजू, बदामावर ताव; अन् आता दुष्काळ निवारणाच्या बैठकीत आमदाराचा जेवणावर ताव? काँग्रेस नेत्याने पोस्ट केला Video
बैठकीत जेवणावर ताव?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 21, 2026 | 5:35 PM

महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यांपासून पाऊसच झालेला नाहीये, त्यामुळे यंदा राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. खरीप हंगाम हातचा गेला आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांचं लक्ष आता सरकारच्या मदतीकडे लागलं आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष अधिवेशन बोलवावं, राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांकडून सुरू आहे. दरम्यान राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारदरबारी देखील हालचाली वाढल्या आहेत. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठकींचं आयोजन करण्यात येत आहे. मात्र या आढावा बैठकी चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

पहिली आढावा बैठक नांदेडमध्ये पार पडली होती. या बैठकीमध्ये दुष्काळावर चर्चा सुरू असताना नेते आणि मंत्री काजू, बदाम खाताना दिसले, त्यामुळे या बैठकीवरून जोरदार टिका झाली.  तर दुसरीकडे अकोला येथे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू असताना या बैठकीत अधिकारी चक्क सोशल मीडियावर व्यस्त असल्याचं पहायला मिळाला, त्यामुळे ही बैठक देखील चांगलीच चर्चेत आली.  दरम्यान त्यानंतर आता महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे.  हा व्हिडीओ एका बैठकीचा आहे.  दुष्काळाने बळीराजा होरपळ आहे, आणि इथे सत्ताधारी आमदार नारायण कुचे जेवणावर ताव मारत आहेत, असं त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

 

नेमकं काय म्हणाले शिवराज मोरे? 

‘दुष्काळाने बळीराजा होरपळतोय, पीक जळून खाक झालंय, पण दुष्काळ निवारणाच्या बैठकीत सत्ताधारी आमदार नारायण कुंचे जेवणावर ताव मारत आहेत! कधी काजू-बदाम, तर कधी शाही जेवण… महायुती सरकारने बळीराजाची चेष्टा थांबवावी आणि तात्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी!’ असं आपल्या ट्विटमध्ये शिवराज मोरे यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us