AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Bhondekar Video : अचानक स्टेज तुटला अन् आमदार खाली पडले, गाण्याच्या कार्यक्रमात काय घडलं?

एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नरेंद्र भोंडेकर स्टेजवरून खाली कोसळले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे.

Narendra Bhondekar Video : अचानक स्टेज तुटला अन् आमदार खाली पडले, गाण्याच्या कार्यक्रमात काय घडलं?
narendra bhondekar
| Updated on: Sep 30, 2025 | 7:13 PM
Share

Narendra Bhondekar : भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडकर यांचा सध्या एक व्हिडीओ फार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते नाचत असताना चक्क मंचावरून खाली पडले आहेत. मंच तुटल्याने हा अजब प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला असून या दुर्गघटनेत त्यांचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. भोंडकर यांना यात किरकोळ इजा झाली आहे.

नेमकं काय घडलं?

सध्या देशभरात नवरात्रोत्सवाची धूम आहे. महाराष्ट्रातही हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. शहरांत जागोजागी गरबा आयोजित करण्यात येत आहे. नेतेमंडळीदेखील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या सणाचा पुरेपूर वापर करत आहेत. राज्यभारातील आमदार, खासदारांकडून आपापल्या मतदारसंघात गरबाचे आयोजन केले आहे. काही ठिकाणी तर आकर्षक बक्षिसंदेखील ठेवण्यात आली आहेत. भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीदेखील पवनी शहरात शहनाज अख्तर यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

हा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. शहनाज अख्तर यांच्या गायनामुळे वातावरण भारून गेले होते. हाच गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना आमदार व कार्यकर्ते स्टेजवर चढले व नाचू लागले. क्षमतेपेक्षा जास्त लोक वर आल्यामुळे मंच अचानक तुटला. इकडे आमदार भोंडेकर तसेच त्यांचे कार्यकर्ते डान्स करण्यात मग्न होते. असे असतानाच अचानकपणे मंच तुटला. त्यामुळे अचानकपणे भोंडेकर तसेच त्यांचे कार्यकर्ते खाली कोसळले. या दुर्घटनेत काहींना थोडीफार दुखापत झाली असल्याचं बोललं जात आहे. आमदार भोंडेकर यांना किरकोळ इजा झाली आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

नरेंद्र भोंडेकर कोण आहेत?

नरेंद्र भोंडेकर यांनी 2024 साली एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून भंडारा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना एकूण 48.82 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या पूजा थावकार यांना पराभूत केले. काँग्रेसच्या उमेदवाराला तिथे 34.17 टक्के मते मिळाली होती. नरेंद्र भोंडेकर हे हिंदू बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील आहेत.

पाहा दुर्घटनेचा व्हिडीओ :

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...