शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं… निलेश राणे कडाडले, थेट भाजपाच्या प्रवक्तांवर टीका करत..

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या पाच जागांचा निकाल लागल्यानंतर महायुतीत मोठी वादाची ठिणगी पडली आहे. दोन्ही बाजुंकडून आरोप होत आहेत. त्यातच आता महायुतीमधील वाद वाढताना दिसत आहे.

शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं... निलेश राणे कडाडले, थेट भाजपाच्या प्रवक्तांवर टीका करत..
Nilesh Rane
| Updated on: Oct 30, 2026 | 11:06 AM

राज्यातील 3 पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे निकाल पुढे आले. तब्बल 45 तास मतमोजणी राज्यात सुरू होती. शेवटी नागपूर पदवीधर मतदार संघाचा निकाल लागला. जिथे भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने बाजी मारली. राज्यात या निकालात देखील महायुती वरचढ ठरणा असल्याचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात उलटे घडले. महाविकास आघाडीने या निवडणुकीत मोठी बाजी मारली. 3 महाविकास आघाडी तर 2 महायुती असा निकाल लागला. हा महायुतीसाठी धक्का आहे. या निकालानंतर भाजपाने शिवसेना शिंदे गटाकडे बोट दाखवले. मित्र पक्षाने सहकार्य केले नसल्याने आपला पराभव झाल्याचे भाजपाने म्हटले. पुण्यासह नागपूरमध्ये भाजपाला धक्का बसला. विधान परिषदेच्या या निवडणुकीमुळे दोन्ही देशातील वाद चव्हाट्यावर आला. भाजपाचे नेते जाहीरपणे शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत. रवींद्र धंगेकर यांनीही जोरदार समाचार घेतला. खंडणीखोर उमेदवार भाजपाने पुण्यात दिल्याचे धंगेकरांनी म्हटले.

दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले असताना पदवीधर निवडणुकीच्या पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडू नका, असे विधान शिवसेना नेते निलेश राणे यांनी केले होते. हेच नाही तर नवनाथ बन यांची ताकद नाही बोलण्याची त्यांच्या मधून कोण बोलायला लावतात का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. यादरम्यानच आता निलेश राणे यांनी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली.

Loading...

या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी थेट भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर निशाणा साधला. निलेश राणे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं…. तुझी लायकी किती तू बोलतो किती… आता निलेश राणेंची ही पोस्ट व्हायरल होत आहे. नवनाथ बन यांच्याकडून शिवसेना शिंदे गटावर टीका केली जात आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या पाच जागांचा निकाल लागल्यानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.  भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी या पराभवासाठी शिवसेनेला जबाबदार धरले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आता शिवसेना नेत्याने निलेश राणे जोरदार पलटवार केला आहे. बिनबुडाचे आरोप करून युतीत मिठाचा खडा टाकू नका, शिवसेनेवर बोलाल तर शिवसेनेसारखेच उत्तर मिळेल, असा थेट इशारा त्यांनी यापूर्वी दिला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us