AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Silver Price: चांदी स्वस्त होताच खरेदीची घाई करू नका! एक्सपर्ट्सनी दिला इशारा

चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला काय? गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी!

| Updated on: Oct 30, 2026 | 11:05 AM
Share
जानेवारी 2026 मध्ये चांदीच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या दरात तब्बल 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या घसरणीमुळे सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार संभ्रमात पडले आहेत. आता चांदी खरेदी करावी, गुंतवणूक कायम ठेवावी की नुकसान कमी करण्यासाठी काही युनिट्स विकावीत, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

1 / 6
28 जानेवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव प्रति औंस 117 डॉलर्सवर पोहोचला होता. मात्र, 23 ऑक्टोबरपर्यंत हा भाव घसरून 54 डॉलर्सच्या आसपास आला. भारतातही एमसीएक्सवर चांदीचा भाव जानेवारीतील 3.85 लाख रुपये प्रति किलोवरून 27 ऑक्टोबरपर्यंत जवळपास 1.19 लाख रुपयांवर आला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता चांदीच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.

2 / 6
वेल्थ मॅनेजर्सच्या मते, केवळ चांदीचे भाव घसरले म्हणून लगेच गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेऊ नये. 'वेल्दी डॉट इन'चे सह-संस्थापक प्रशांत गुप्ता यांच्या मते, आधी महाग दराने चांदी खरेदी केली म्हणून ती विकण्याची गरज नाही. मात्र, चांदीमध्ये मोठी गुंतवणूक असलेल्या लोकांनी आपल्या पोर्टफोलिओचा आढावा घेणे आवश्यक आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी संयम ठेवावा.

3 / 6
'आनंद राठी वेल्थ'चे कार्यकारी संचालक आदिल चाको यांनी चांदीमध्ये अतिरिक्त गुंतवणूक करण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, भाव घसरल्यानंतर सरासरी खरेदी मूल्य कमी करण्यासाठी आणखी चांदी खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. कारण चांदीच्या किमतीत मोठे चढ-उतार होतात. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये चांदीचा हिस्सा जास्त असल्यास टप्प्याटप्प्याने गुंतवणूक कमी करून विविध इक्विटी म्युच्युअल फंडांचा विचार करता येऊ शकतो.

4 / 6
चांदीमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडता येतो. यामुळे वेगवेगळ्या किमतींवर चांदी खरेदी करण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ, चांदीमध्ये गुंतवण्यासाठी 60 हजार रुपये असतील, तर संपूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवण्याऐवजी ठरावीक अंतराने छोटी रक्कम गुंतवता येते. मात्र, SIP मुळे बाजारातील घसरणीचा धोका पूर्णपणे टळत नाही.

5 / 6
सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक करताना केवळ चांदीचा बाजारभाव पाहणे पुरेसे नाही. ईटीएफचे बाजारातील मूल्य आणि त्याचे iNAV म्हणजेच सांकेतिक शुद्ध मालमत्ता मूल्य यांची तुलना करणेही महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, ईटीएफची बाजारातील किंमत 100 रुपये आणि iNAV 103 रुपये असल्यास गुंतवणूकदार 3 टक्के प्रीमियम देऊन युनिट खरेदी करत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी प्रीमियम, पोर्टफोलिओमधील चांदीचा हिस्सा आणि गुंतवणुकीचा कालावधी तपासणे आवश्यक आहे.

6 / 6
Follow Us
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...