AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्णेकर प्रकरणात मोठा ट्विस्ट… मिनाक्षी शिंदेंनीच नवऱ्याला सुपारी दिली, एकनाथ शिंदेंना सर्व माहीत; बड्या नेत्याचा धक्कादायक आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीच पती राजेंद्र शिंदेंना पूर्णेकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप राऊतांनी केला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना याची माहिती असूनही पोलीस आरोपींना वाचवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

पूर्णेकर प्रकरणात मोठा ट्विस्ट... मिनाक्षी शिंदेंनीच नवऱ्याला सुपारी दिली, एकनाथ शिंदेंना सर्व माहीत; बड्या नेत्याचा धक्कादायक आरोप
pradip purnekarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2026 | 10:51 AM
Share

प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. पूर्णेकर यांच्या हत्येची सुपारी शिंदे गटाच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना दिली आहे. राजेंद्र शिंदे यांनी ही सुपारी खालच्या लोकांना दिली. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याची माहिती आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी आरोपांची राळ उडवून दिली असून त्यावर आता शिंदे गटातून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेंचा सहभाग आहे. याचे पुरावे आहेत. पूर्णेकर यांच्या हत्येच्या एक तासपूर्वी सर्व आरोपी राजेंद्र शिंदेंसोबत बसले आहेत. या प्रकरणाची मुख्य सूत्रधार मिनाक्षी शिंदे आहे. त्यांनीच नवरा राजेंद्र शिंदेंना सुपारी दिली. राजेंद्र शिंदेंनी खाली या लोकांना सुपारी दिली. अशा प्रकारचं कारस्थान झालं. हे ठाण्याचे पोलीस आणि एसआयटीला माहीत आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंना माहीत आहे. प्रत्येकांना माहीत आहे. तरीही पोलीस आरोपींना का वाचवत आहे? हा प्रश्न आहे. पोलीस आयुक्त कुणाला वाचवत आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

गृहमंत्री, पोलीस आयुक्तांचा बळी जाईल

आम्ही काल पोलीस आयुक्तांना पुरावे दिले. पुरावे पाहिल्यावर तेही कन्व्हिन्स झाले आहेत. मिनाक्षी शिंदे आणि राजेंद शिंदे आरोपी आहेत. तेच सुत्रधार आहेत, याची खात्री पोलिसांनाही पटली आहे. तरीही त्यांना अटक होत नसेल तर या राज्याला दुर्बल आणि हतबल गृहमंत्री मिळाला आहे. या प्रकरणात गृहमंत्र्यांचा बळी जाईल. आता विधीमंडळाचं अधिवेशन येणार आहे. पार्लमेंट सुरू होणार आहे. लोकांचा दबाव आहे. त्यांनी या प्रकरणात कारवाई करावी, नाही तर पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांचा बळी जाईल, असा दावा राऊत यांनी केलाय.

पालकमंत्र्यांना महागात पडेल

निष्पाप राजकीय कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. ती दडपण्याचं काम पालकमंत्री आणि इतर लोक करत आहेत. काल आमचं आंदोलन दडपण्याचं काम झालं. त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी पुरावे पाहिले पाहिजे होते आणि आमच्यासोबत आंदोलनात यायला हवं होतं. बाळासाहेबांची शिवसेना इतकी अमानुष नव्हती. याचा अर्थ तुम्ही ड्युप्लिकेट आहात. ज्याची हत्या झाली त्याच्या कुटुंबाचं दु:ख तुम्हाला कळणार नाही. पूर्णेकरांचा मुलगा एकटा पालकमंत्र्याच्या घरी निवेदन जायला जात होता. सत्य सांगणार होता. त्याला पोलिसांनी फरफटत नेलं. त्यांच्याशी सरकार असं वागत आहे. भविष्यात पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि ठाण्याच्या पालकमंत्र्यांना महागात पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

पुढच्या आंदोलनाची दिशा ठरेल

आदित्य ठाकरे यांच्यासोबत काल आम्ही सर्व नेते, पदाधिकारी पोलिसांना भेटायला गेलो होतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख लोकं उपस्थित होते. सर्वपक्षीय आंदोलन सुरू होतं. पोलीस आयुक्त चांगले गृहस्थ आहेत. पण ते दबावात होते, असं सांगतानाच या प्रकरणात पुढच्या आंदोलनाची दिशा ठरेल. ठाण्यात गेलो आणि आलो. आम्ही राजकीय वरातीत गेलो नव्हतो. आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यासाठी गेलो होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलंय

Follow Us
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?