AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणात आघाडीचा निलेश राणेंना छुपा पाठिंबा?

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची निवडणूक आता रंगतदार अवस्थेत आली आहे. या निवडणुकीत आता आघाडीनं आपले पत्ते ओपन  करत, एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्त केला आहे. राणे विरुद्ध सेना अशी इथं टक्कर असताना, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून नविनचंद्र बांदीवडेकर हे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आघाडीनं नवखा उमेदवार देऊन राणेंना एकीकडे मतद केली, […]

कोकणात आघाडीचा निलेश राणेंना छुपा पाठिंबा?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची निवडणूक आता रंगतदार अवस्थेत आली आहे. या निवडणुकीत आता आघाडीनं आपले पत्ते ओपन  करत, एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्त केला आहे. राणे विरुद्ध सेना अशी इथं टक्कर असताना, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून नविनचंद्र बांदीवडेकर हे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. आघाडीनं नवखा उमेदवार देऊन राणेंना एकीकडे मतद केली, तर दुसरीकडे जातीचं कार्ड वापरुन आघाडीनं भंडारी समाजाला गोंजारण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आघाडीच्या उमेदवाराचा फटका कुणाला बसणार याची चर्चा सध्या कोकणात रंगली आहे.

राज्यातील महत्वाच्या दहा मतदार संघापैकी एक मतदार संघ म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघ. या मतदार संघात खरी लढत जरी शिवसेना आणि नारायण राणेंमध्ये असली तरी आता या मतदार संघातील निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. कारण आघाडीकडून नविनचंद्र बांदीवडेकर हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. नवीनचंद्र यांची उमेदवारीची घोषणा आता फक्त औपचारीक ठरली आहे. नवीनचंद्र बांदीवडेकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील आहेत. अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्षही आहेत.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे लोकसभेच्या रिंगणात आहेत. नारायण राणे यांनी  आपल्या थेट शरद पवारांकडे मुलासाठी मदतीचा हात मागितला होता. त्यामुळे आघाडीकडून उमेदवार दिला जाणार की नाही अशी शक्यता वर्तवली जात असताना, अखेर आघाडीनं उमेदवार दिलाच. मात्र अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर यांच्यासारख्या मोठ्या नावाला फाटा देत, आघाडीनं नवखा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. एक प्रकारे आघाडीनं राणेंना मदत केली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे आघाडीची किंबहुना राष्ट्रवादीची मते बांदीवडेकरांच्या गळाला लागतात का? याबद्दल प्रश्नचिन्ह आहेच. पण आघाडी आपला धर्म पाळेल असं बांदीवडेकरांना वाटत आहे.

शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत, तर स्वाभिमानकडून निलेश राणे यांची उमेदवारी पक्की आहे. मात्र आघाडीनं काठी पण तुटू नये आणि साप पण मारला जावा अशी खेळी खेळली आहे. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना राणेंनी मदत केली होती. त्यामुळे ही फिट्टांफिट राष्ट्रवादी करु शकते. त्यामुळे आघाडी किंवा युती यामुळे आपल्याला काही फरक पडत नसल्याचं निलेश राणे यांना वाटत आहे.

आघाडीनं एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. नवखा उमेदवार देत राणेंना मदत केल्यासारखं दाखवंल जात आहे. तर दुसरीकडे आघाडीनं उमेदावर देऊन आव्हान उभं केल्याचं चित्र आहे. त्यामुळे युतीमधली भाजपची खदखद सुद्धा सेनेसाठी डोकेदुखी असणार आहे. त्यामुळे भाजपला आता सेनेकडून सुद्धा गोंजारण्याचे प्रयत्न सुरु झालेत. त्यामुळे मनोमिलम लवकर होईल असं शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना वाटत आहे.

व्हिडीओ :

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.