मोठी बातमी! आमदार परिणय फुकेंच्या मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत भीषण अपघात, पाच जखमी, एकाचा मृत्यू, सपकाळ यांचा गंभीर आरोप

मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील पेंच अभयारण्य परिसरात भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप केले आहेत.

मोठी बातमी! आमदार परिणय फुकेंच्या मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत भीषण अपघात, पाच जखमी, एकाचा मृत्यू, सपकाळ यांचा गंभीर आरोप
MLA Parinay Phukes son accident
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 4:33 PM

मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील पेंच अभयारण्य परिसरात भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आमदार परिणय फुके यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. ‘अपघातग्रस्त गाडी भाजप आमदार परिणय फुके यांच्या मालकीची आणि अपघातावेळी त्यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे. ‘ असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सपकाळ यांनी नेमकं काय म्हटलं?

Loading...

‘मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील नागपूरजवळच्या पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त गाडी भाजप आमदार परिणय फुके यांच्या मालकीची आणि अपघातावेळी त्यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे. एका तरुणाचा जीव गेला आहे, त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा किंवा राजकीय दबावातून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न अजिबात खपवून घेतला जाणार नाही. आमदाराचा मुलगा म्हणून कायद्यापासून संरक्षण मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे. निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे!’  असं ट्विट या प्रकरणात हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे.

दरम्यान दुसरीकडे या अपघात प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील गंभीर आरोप केले आहेत. भाजपा आमदार परिणय फुके यांच्या मुलासह पाच ते सहा मुला, मुलींचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केली आहे. चेक पोस्ट उडवून भरधाव वेगात कार उलटली असेही सुषमा अंधारे यांनी म्हटल आहे. सत्तेची ताकद वापरून हे अपघात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे. त्यामुळे आता हे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us