मोठी बातमी! शिंदे गटाचा आणखी एक मंत्री गोत्यात, रोहित पवारांनी केले गंभीर आरोप, थेट कागदपत्रे दाखवत…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर मागणी काही दिवसांपासून गंभीर आरोप होताना दिसत आहेत. आता रोहित पवार यांनी परत एकदा आरोप केली आहेत आणि काही कागदपत्रेही दाखवली आहे. पत्रकार परिषदेमध्ये ते मोठे खुलासे करताना दिसले आहेत.

मोठी बातमी! शिंदे गटाचा आणखी एक मंत्री गोत्यात, रोहित पवारांनी केले गंभीर आरोप, थेट कागदपत्रे दाखवत...
Rohit Pawar
| Updated on: Aug 25, 2025 | 11:15 AM

रोहित पवार यांनी नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याबाबत गंभीर आरोप केली आहेत. यादरम्यान त्यांनी सिडको अहवाल देखील वाचून दाखवला. मुंबईतील जमीन घोटाळ्यात मंत्री संजय शिरसाट यांचा हात असल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही गंभीर आरोप होताना दिसत आहेत. हेच नाही तर त्यांच्या बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल झाला, त्यामुळे पैशांच्या बॅग त्यांच्या बाजूला पडली असल्याचा आरोप झाला. आता अजून एक आरोप रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर केला आहे.

रोहित पवार यांनी म्हटले की, सिडकोने थेट दिलेल्या अहवालात या प्रकरणात स्पष्टपणे म्हटले आहे की, विधी आणि न्याय विभागाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. यासोबतच नगरविकास विभागाचेही पत्र आले आहे. नवी मुंबईतील हा जमीन घोटाळा आहे. विधी आणि न्याय विभागाने दिलेला सर्व रिपोर्ट माझ्याकडे आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. तिथे स्पष्टपणे सांगण्यात आलंय की, तुम्ही दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे.

बिवलकर कुटुंबाचे खरेदी केलेल्या जमिनीचे प्रकरण चर्चेत आले असून संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आली. आता संजय शिरसाट यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर सततच्या आरोपांमुळे संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी ही विरोधकांकडून केली जात आहे. त्यामध्येच आता संजय शिरसाट यांच्या विरोधात रोहित पवार हे मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेल्या आरोपांवर आता मंत्री संजय शिरसाट हे काय उत्तर देतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. संजय शिरसाट मुंबईतील या जमीन प्रकरणात अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र बघायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलच्या लिलावावरूनही त्यांच्यावर गंभीर आरोप झाली होती, त्यामध्ये थेट त्यांच्या मुलाचे नाव आले होते. संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना नेहमीच थेट पणे उत्तर दिले आहे. आता विरोधक हे प्रकरण उचलून धरण्याची दाट शक्यता आहे.