
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील जमीन खोटाळा प्रकरणात गंभीर आरोप केली जात आहेत. अमोडिया कंपनीने पुणे कोरगाव पार्कमध्ये एक जमीन व्यवहार केला. जो वादात सापडला. पुण्यातील 1800 कोटी रुपयांची जमीन 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. हेच नाही तर सतत होणाऱ्या आरोपांनंतर हा जमीन व्यवहार रद्द करण्यात आला. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. अमोडिया कंपनीत पार्थ पवारचे 99 टक्के शेअर्स आहे तर 1 टक्के शेअर्स दिग्विजय पाटील याचा आहे. पार्थ पवारवर या प्रकरणात अजूनही गुन्हा दाखल झाला नाही पण 1 टक्का शेअर्स असलेल्या दिग्विजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला. विरोधकांकडून या प्रकरणात अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
अजित पवारांनी स्पष्ट सांगितले की, या जमीन व्यवहाराबद्दल मला कल्पना नाही. मुले मोठी झाली आहेत आणि ते त्यांची व्यवसाय करतात असे त्यांनी म्हटले. आता आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच पार्थ पवार याच्या जमीन घोटाळा प्रकरणात बोलताना दिसले आहेत. कालच शरद पवार यांनी आपले मत मांडले असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत चाैकशीची मागणी या प्रकरणात केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, तुम्ही सरकारमध्ये असो किंवा नको जर चुकीची गोष्ट होत असेल तर कारवाई ही झाली पाहिजे. त्याबाबतची शहानिशा झाली पाहिजे, काय खरे काय खोटे हे लोकांपुढे आले पाहिजे. पण हे सर्व बघताना चेंन काय हे बघितले पाहिजे. कारण कोणताही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो. पाठिंबा देणारे काही अधिकारी असतात तर मग हे अधिकारी कोण? कशा पद्धतीने ते वागतात. अधिकारी काही लोकांनाच का महत्व देतात? काही लोकांचेच काम का होतात? गरीबाची का होत नाहीत.
आमचे एकच मत आहे की, कुठल्याही नेता असुद्या, नेत्याच्या परिवारातील व्यक्ती असुद्या.. चूक केली असती तर ती चूकच समजून योग्य पद्धतीची कारवाई ही झाली पाहिजेत. पण ही कारवाई होताना भेदभाव कुठे झाला नाही पाहिजे याचही काळजी घेतली पाहिजे. पार्थ पवार प्रकरणात पहिल्यांदाच थेटपणे बोलताना आमदार रोहित पवार हे दिसले आहेत.