AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार गट NDAसोबत जाणार का? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

rohit pawar news : शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. यावर रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार गट NDAसोबत जाणार का? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
| Updated on: Jul 07, 2026 | 12:19 PM
Share

राज्यात एकनाथ शिंदेंचं ‘ऑपरेश टायगर’ यशस्वी झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ‘ऑपरेश टायगर’नंतर आता शरद पवार गट NDA सोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन बडे नेते भेटल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या दोन नेत्यांच्या कथीत भेटीने राज्यात आणखी एक ‘ऑपरेशन’ सुरू असल्याची चर्चा आहे. परंतु शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार नाही, या सर्व अफवा आहेत, असं म्हणत रोहित पवार यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

शरद पवार गटाचे राज्यात 10 आमदार आहेत. तर 8 खासदार आहेत. 8 खासदार असल्यामुळे शरद पवार गटाचं लोकसभेत वजन आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला होता. त्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी देखील सत्तेच्या मार्गावर जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व चर्चा फेटाळून लावताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, अशी फक्त चर्चा आहे. त्याला कुठेही तथ्य नाही’.

रोहित पवार काय म्हणाले? 

‘आमची केंद्रात कोणत्याही एनडीएच्या नेत्या सोबतही चर्चा सुरू नाही. काँग्रेसच्या नेत्यांसोबतही चर्चा सुरू नाही. तसेच राज्यातही कोणासोबत चर्चा चालू नाही. आज आम्ही विरोधतला पक्ष, पुरोगामी विचारांचा पक्ष, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 60 वर्ष भाजपच्या विचारांच्या विरोधात लढलेला पक्ष आहे. आज फक्त महाराष्ट्र धर्म आणि सर्वसामान्यांची भूमिका मांडत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याच्या चर्चेवर दत्तात्रय भरणे काय म्हणाले?

मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, मला याबाबत काहीच माहिती नाही. विनोद तावडे आणि जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्र काम केलं आहे. पक्षविरहित त्यांचं नातं आहे. त्यामुळे ते भेटले असावेत. या राष्ट्रवादीशी माझं नातं वेगळं आहे. त्यांच्या निर्णयावर पक्षाचे वरिष्ठ नेत्या सुनेत्रा पवार भाष्य करतील’.

Follow Us
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?