MLA Shweta Mahale Agitation : बळीराजासाठी भाजपची राज्यभर काळी दिवाळी, आमदार श्वेता महालेंनी बेसन-भाकरी खाऊन नोंदवला निषेध

| Updated on: Nov 04, 2021 | 12:40 PM

बुलढाणा : जिल्ह्यातील चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी केली. बेसन-भाकर खावून तसेच काळे कंदील दाखवून राज्य सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा, अशी मागणी या अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून भाजपच्या वतीनं करण्यात आली.

MLA Shweta Mahale Agitation : बळीराजासाठी भाजपची राज्यभर काळी दिवाळी, आमदार श्वेता महालेंनी बेसन-भाकरी खाऊन नोंदवला निषेध
आमदार श्वेता महाले
Follow us on

 

बुलढाणा : जिल्ह्यातील चिखलीच्या (chikhali) भाजपच्या आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale) यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी केली. बेसन-भाकर खावून तसेच काळे कंदील दाखवून राज्य सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा, अशी मागणी या अभिनव आंदोलनाच्या माध्यमातून भाजपच्या वतीनं करण्यात आली.

अंधारात काळ्या कंदिलाच्या सोबतीने दिवाळी

चिखली विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. मात्र, अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली नाही. गेल्या आठवड्यात भाजपच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिला होता. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट मदत मिळाली नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. गागलगाव, धार, रायपूर अशा काही गावांमध्ये शेतकरी काळी दिवाळी साजरी करीत आहेत.

काळे झेंडे दाखवून केला सरकारचा निषेध

महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्याचं दिवाळ काढलं आहे. बळीराजा हा उदार आहे.पण, या बळीराजाचं बळी घेण्याचं काम या महाविकास आघाडीनं केलं आहे. त्यामुळं या महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्याते. शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिवा लावायला तेल नाही. सरकारचा निषेध करण्यासाठी काळे झेंडे दाखविण्यात आले. तसेच कंदील दाखविण्यात आला. या कंदिलात टाकायला तेल नाही. तो पेटवायचा कसा असा प्रश्न विचारण्यात आला.

आमदारांनी पंगतीत बसून खाल्ली बेसन-भाकरी

शेतकऱ्यांच्या या आंदोलनात भाजपच्या आमदार श्वेता महाले या सहभागी झाल्या होत्या. पंगतीत बसून त्यांना बेसन, भाकरी खाल्ली. बाजूला महिला शेतकरी होत्या. शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आमदारांना शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावं लागलं.

आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे

दिवाळी हा आनंदाचा सण. हा सण सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पण, चिखली तालुक्यात शेतकरी अंधारात आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अतिवृष्टीने त्यांचे नुकसान झाले. सरकारनं मदत केली नसल्यानं शेतकऱ्यांना दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. आता तरी राज्य सरकारनं जागं व्हावं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणं अपेक्षित आहे. शेतकरी त्यासाठी मदतीची आस लावून बसले आहेत.

इतर संबंधित बातम्या

दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा दिलासा; गोडतेल लिटरमागे 7 रुपयांनी स्वस्त

यावेळी फटाके नको, दिवाळी पहाट कार्यक्रमात कोरोना नियम पाळा, नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!

Buldana | शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा, चिखलीत आमदार श्वेता महालेंचं आंदोलन -tv9