यावेळी फटाके नको, दिवाळी पहाट कार्यक्रमात कोरोना नियम पाळा, नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

दीपावली हा सण कसा साजरा करावा यासाठीदेखील नियमावली जारी करण्यात येत आहे. नागपुरात दिवाळी उत्सवा संदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यावर्षीदेखील दिवाळी सण साध्या पद्धतीने साजरा करावा असे नागपूरचे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी निर्देश दिले आहेत.

यावेळी फटाके नको, दिवाळी पहाट कार्यक्रमात कोरोना नियम पाळा, नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
corona guidelines nagpur


नागपूर : वर्षातील सर्वात मोठा म्हटला जणारा दिवाळी हा सण काही दिवसांवर आलाय. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आतापर्यंतचे सर्व सण साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले असून आता दीपावली हा सण कसा साजरा करावा यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. नागपुरात दिवाळी उत्सवासंदर्भात जिल्हाधिकारी विमला आर. यांनी निर्देश दिले आहेत.

फटाके फोडणे टाळावे, दिव्यांची आरास करा

दिवाळी उत्सव घरगुती आणि मर्यादित स्वरूपात साजरा करावा. यावर्षी फटाके फोडणे टाळावे. तसेच दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करा. दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिले आहेत.

मागील वर्षी दीपावली साध्या पद्धतीने साजरी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. उद्योग, दुकाने तसेच अन्य आस्थापना उघडण्याची वेळ वाढवून देण्यात आलीय. मागील वर्षी कोरोना संसर्गाचा धोका असल्यामुळे दिवळीसह अन्य सण साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. यावर्षी रुग्णसंख्या कमी आहे, असे असले तरी यंदा दिवाळी साध्यापणाने साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारकडून केले जात आहे. त्यानंतर आता नागपूर जिल्हा प्रशासनाने दीपावली सणासाठी नियमावली सांगितली आहे.

पुण्यात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी

नागपूरपाठोपाठ पुणे शहरातदेखील दीपावली उत्सव साजरा करण्यासाठी नियमावली जारी करण्यात आलीय.  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 नुसार पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 1 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून ते 30 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण मनाई करण्यात आली आहे.

इतर बातम्या :VIDEO: नाव काय तुमचं?, इथे काय करता?, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीत भर गर्दीत साधला चक्क मराठी माणसाशी संवाद

Video : सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस! खासदार उदयनराजे म्हणतात, ‘गरीब शेतकरी सभासदांची जिरवू नका’

‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत राहिला तर त्यांची विश्वासार्हता संपेल’, पृथ्वीराज चव्हाणांचा केंद्र सरकारवर निशाणा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI