‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत राहिला तर त्यांची विश्वासार्हता संपेल’, पृथ्वीराज चव्हाणांचा केंद्र सरकारवर निशाणा

केंद्रीय तपास संस्थांचा वापर करुन धमकापलं जात आहे. अशा पद्धतीनं तपास संस्थांचा वापर गैर आहे. अशाप्रकारे तपास संस्थांचा वापर होत राहिला तर त्यांची विश्वासार्हता संपेल. या तपास यंत्रणांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही, अशी खोचक टीका चव्हाण यांनी केलीय.

'केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत राहिला तर त्यांची विश्वासार्हता संपेल', पृथ्वीराज चव्हाणांचा केंद्र सरकारवर निशाणा
पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री


मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा अनेक केंद्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. केंद्रीय तपास संस्थांचा वापर करुन धमकापलं जात आहे. अशा पद्धतीनं तपास संस्थांचा वापर गैर आहे. अशाप्रकारे तपास संस्थांचा वापर होत राहिला तर त्यांची विश्वासार्हता संपेल. या तपास यंत्रणांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही, अशी खोचक टीका चव्हाण यांनी केलीय. (Prithviraj Chavan criticizes Modi government over Central Investigation Agency’s action)

‘लसीकरणाबाबत फक्त प्रसिद्धी’

एनसीबी इथल्या काही प्रमाणातल्या ड्रग्सवर कारवाई करते. पण गुजरातमध्ये 30 हजार कोटी रुपयांचं ड्रग्स सापडलं त्याची कुणीच चर्चा करत नाही. लसीकरणाबाबतही फक्त प्रसिद्धी केली जात आहे. पण जगात दोन डोस घेतलेल्यांच्या यादीत देश 144 व्या स्थानी आहे. भारतात फक्त 24 टक्के लोकांना डोस मिळाले आहेत. खोटी प्रसिद्धी देऊन अपयश लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही चव्हाण यांनी मोदी सरकारवर केलीय.

‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ नसून ती करवाढ’

पेट्रोल-डिझेलची दरवाढ नसून ती करवाढ आहे. सरकार हा कर वापरुन खर्च भागवायचा प्रयत्न करत आहे. पण त्याने सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागतो. गेल्या सात वर्षात केंद्रानं पेट्रोल-डिझेलमधून 23 लाख कोटी रुपये मिळवल्याचा दावाही चव्हाण यांनी केलाय.

‘लोकशाही भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने’

‘संस्थात्मक रचना ताब्यात घेऊन मनमानीपद्धतीने काम केले जात आहे. खऱ्या अर्थाने देशात लोकशाही राहिलेली नसून हुकूमशाही व्यवस्थेकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे असे चित्र जगात निर्माण झाले आहे. पॅगेसीसच्या माध्यमातून हेरगिरी करून सर्वांची माहिती घेतली जात आहे, हे कोण करतेय याची चौकशी सरकार करत नाही. रशियातील केजीबीचा एक अधिकारी नंतर देशाचा पंतप्रधान झाला त्यानंतर राष्ट्राध्यक्ष झाला आणि आता आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष बनून रशियात एकाधिकारशाही आणली आहे भारताची वाटचालही रशियाच्या दिशेनेच सुरु आहे’, अशा शब्दात चव्हाण यांनी सप्टेंबरमध्ये मोदी सरकारवर हल्ला चढवला होता.

‘मोदी हटाव देश बचाव’

23 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना दारिद्र्याच्या खाईत लोटणाऱ्या केंद्र सरकारविरोधात ‘मोदी हटाव देश बचाव’ असा नारा आम्ही सायकल रॅलीच्या माध्यमातून देत आहोत. मनमोहनसिंग यांचे सरकार असताना 124 डॉलर प्रति बॅरलप्रमाणे कच्च्या तेलाचे दर होते. सध्या कच्च्या तेलाचे दर 60 ते 65 डॉलर प्रती बॅरल असे दर असतानाही पेट्रोल डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. केंद्र सरकार सामान्य लोकांवर कर लादून स्वतःच्या झोळ्या भरण्याचं काम करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी मोदी सरकारवर केला होता.

इतर बातम्या :

Video : सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस! खासदार उदयनराजे म्हणतात, ‘गरीब शेतकरी सभासदांची जिरवू नका’

केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा ‘सामना’चा संपादक असणं माझ्यासाठी महत्वाचं- संजय राऊत

Prithviraj Chavan criticizes Modi government over Central Investigation Agency’s action

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI