
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( एमएमआरडीए ) मुंबईच्या पायाभूत विकासासाठी आणखी एक क्रांतीकारण पाऊल उचलले आहे. मुंबईतील पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर,घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे पर्यंतच्या विस्तारीकरणाचे (Elevated Eastern Freeway Extension) बांधकाम सुरू केले आहे.एकूण १३.९० किमी लांबीच्या या पूर्णपणे उन्नत अशा सहा पदरी हाय-स्पीड कॉरिडॉरमुळे दक्षिण मुंबई आणि ठाणे दरम्यानचा प्रवास हा अवघ्या २५-३० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
हा कॉरिडॉर आनंद नगरपासून मुलुंड, ऐरोली, JVLR, विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपर मार्गे जाणार असून शेवटी छेडानगर येथे संपेल. पूर्व द्रुतगती महामार्गावरील होणाऱ्या वाहतूक कोंडीची त्यामुळे सुटका होणार आहे. हा महामार्ग दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे.
ठाण्यात हा प्रकल्प आनंद नगर ते साकेत उड्डाण पुलाजवळ मुलुंड ऑक्ट्रोय नाका येथे आणखी एका उन्नत कॉरिडॉरशी सुलभपणे जोडला जाणार आहे. ज्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. याशिवाय समृद्धी महामार्गाशी देखील हा उन्नत मार्ग जोडला जाणार आहे.
एमएमआरडीएच्या शाश्वत विकासाच्या वचनबद्धतेचा भाग म्हणून तसेच तज्ञ आणि पर्यावरणप्रेमी यांच्याशी विचारविनिमय करून याआधी प्रकल्पाचा विक्रोळी ते घाटकोपर पट्टा पुनर्रचित करण्यात आला आहे. त्यामुळे १२७ पिंक ट्रम्पेट वृक्ष वाचवले गेले आहेत. त्याचप्रमाणे भरपाई लागवड स्वरूपात एकूण ४,१७५ नवी झाडे लावली जाणार आहेत.
✔️ MMR मधील उन्नत रस्त्यासाठी पहिल्यांदाच सिंगल पाईल, सिंगल पियर प्रणाली
✔️ मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शन येथे २ पदरी अप-डाऊन रॅम्प
✔️ नवघर उड्डाणपूल येथे ३+३ पदरी उन्नत टोल प्लाझा
✔️ अखंड, सुरक्षित आणि हाय-स्पीड प्रवासासाठी डिझाईन
* प्राथमिक सर्व्हेची कामे पूर्ण
* टेस्ट पाइल्स पूर्ण
* भू-तांत्रिक तपासणी जवळपास पूर्ण
* युटीलिटी ओळखण्याचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण
* वर्किंग पाइल्स आणि पियर कास्टिंग प्रगतीपथावर