AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सदावर्तेंसोबत भयंकर घडलं, मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतला बदला, जालन्यात मोठा गोंधळ

मोठी बातमी समोर येत आहे, जालन्यामध्ये ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली आहे.

मोठी बातमी! सदावर्तेंसोबत भयंकर घडलं, मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतला बदला, जालन्यात मोठा गोंधळ
गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 09, 2026 | 4:53 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, जालन्यामध्ये ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून सातत्याने मनसेवर आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीका करण्यात येत होती. याविरोधात आता मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे. सदावर्ते यांच्या वाहानावर यावेळी सुपारी देखील फेकण्यात आल्या आहेत.  जालना शहरातील विशाल कॉर्नर भागात ही घडना घडली आहे. दरम्यान यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली आहे. विशाल कॉर्नर परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते यांची गाडी येताच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वहनावर सुपाऱ्या आणि शाई फेकरण्यात आली. या घटनेनं या परिसरात काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. शेवटी पोलिसांनी आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक केल्याची माहिती समोर येत आहे.

राज ठाकरेंवर सातत्याने टीका 

दरम्यान गुणरत्न सदावर्ते हे सातत्याने मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर मनसेनं घेतलेल्या भूमिकेवर देखील त्यांनी चांगलीच टीका केली होती. त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केलं होता.  यापूर्वी देखील गुणरत्न सदावर्ते यांनी अनेकदा मनसेवर टीका केली आहे. त्यानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली आहे.

वातावरण तापणार 

दरम्यान मनसेकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक करण्यात आली आहे. या घटनेमुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. या घटनेवर अद्याप सदावर्ते यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?