ताई तुझा बदला घेतो, शब्द देताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली; कल्याणच्या तरुणीसाठी मोठ्या हालचाली!
कल्याणमध्ये एका मराठी तरुणीला एका अमराठी तरुणाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Kalyan Beating Video : कल्याणच्या मराठी तरुणीला एका अमराठी तरुणाने रुग्णालयात अमानुष मारहाण केलेली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तरुणाने केलेल्या मारहाणीनंतर मराठी तरुणीला चांगलाच धक्का बसला आहे. दरम्यान, आता हे प्रकरण समोर आल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आम्ही तुला झालेल्या मारहाणीचा बदला घेऊ, असे आश्वासन मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीला दिले आहे. त्यानंतर आता मनसेकडून सक्रीय झाली आहे.
तरुणी रुग्णालयात दाखल, उपचार सुरू
मनसेचे अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीवर पक्षातर्फे उपचार केले जातील, असे सांगितले. तसेच या तरुणीला तुझ्या आणखी काय अपेक्षा आहेत. अशी विचारणा केली. तरुणीने मात्र असा प्रकार अन्य कोणावरही घडू नये, अशी आशा व्यक्त केली आहे. अविनाश जाधव यांनी आम्ही तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेऊ, असं आश्वासन दिलंय. हे आश्वासन दिल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. आश्वासनानुसार अविनाश जाधव आणि कार्यकर्त्यांनी पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल केले आहे. तरुणीची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी पैसे नसल्याने तरुणी कालपासूनच आपल्या घरी आहे. त्यामुळे मनसेने तिला रुग्णालयात दाखल केले आहे. या तरुणीवर कल्याण पूर्व येथील जानकी रुग्णालयामध्ये उपचारासाठी केले जात आहेत.
उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जे गुन्हेगार…
तरुणीची भेट घेतल्यानंतर अविनाश जाधव यांनी टीव्ही 9 मराठीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली केली. त्या मुलीची परिस्थिती वाईट आहे. त्या मुलीला लाथ-बुक्कीने मारले आहे. 24 तासांपासून ती त्याच दुःखात असून ती घरीच बसलेली आहे. हा आक्रोश पूर्ण महाराष्ट्राचा आहे. ज्या पद्धतीने तिला अमानुष मारहाण केली त्या पद्धतीवरून मारहाण करणारा आरोपी हा एक अट्टल गुन्हेगार आहे, असा दावा जाधव यांनी केला. तसेच त्याच्या फेसबुक व सोशल मीडियावरून ते दिसून येतंय. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जे गुन्हेगार असतात ते महाराष्ट्रात येतात आणि असे धंदे करतात, असा आरोपही अविनाश जाधव यांनी केला.
हिलांमध्येही या प्रकरणाबद्दल प्रचंड राग- अविनाश जाधव
मुलीला आई-वडील नाहीयेत. त्या तिन्ही बहिणी आहेत. त्या बहिणी कमवतात आणि आपलं घर चालवतात. सोसायटीच्या महिलांमध्येही या प्रकरणाबद्दल प्रचंड राग आहे. त्यांची मोर्चा काढण्याची तयारी आहे. आम्ही आरोपीला लवकरात लवकर अटक करू असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे पीडित तरुणीला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास आहे, असेही अविनाश जाधव म्हणाले.
