
“गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांशी एक दोन वेळा भेटलो. महत्त्वाच्या विषयावर बोलत होतो. साधारणपणे त्याचा आराखडा कसा करता येईल यावर चर्चा होती. 2014 मध्ये अस्थेटिक या विषयावर मी 16 मिनिटांची डॉक्युमेंट्री केली होती. ती इतर भाषेतही करत आहे. टाऊन प्लानिंग आणि इतर गोष्टी आवडीचे विषय आहेत. मी जे सांगतो त्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही. त्यामुळे सांगणं गरजेचं आहे. नाही तर लोकांची मते घेत बसाल” असं राज ठाकरे म्हणाले.
“एका स्कॉटिश साहित्यिकाचं चांगलं वाक्य आहे. तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातात सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मी ते वाक्य बदलू इच्छितो. तुमच्याकडच्या ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा. मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मुंबई, ठाणे नागपूर संभाजी नगर आणि इतर शहरात मोठ्या प्रमाणावर रिडेव्हल्पेंटची कामे सुरू आहेत. अनधिकृत गोष्टीही सुरू आहेत. आज जिथे 50 लोक राहत होती. तिथे 500 लोक राहत आहेत. माणसं वाढली, गाड्या वाढल्या ट्रॅफिक वाढलं. सर्व गोष्टी रस्त्यावर आल्या” असं राज ठाकरे म्हणाले.
‘छोटासा आराखडा मी मुख्यमंत्र्यांना दिला’
“पार्किंग लॉट उभे करायला पाहिजे. सरकार किंवा महापालिकेकडून. शिस्त लावणे गरजेचं आहे. बाहेरच्या राज्यातून लोक आले. ओला, रिक्षा टॅक्सी चालवत आहेत. त्यांना गाड्या कुठे पार्क करायचं माहीत नाही. कुठेही गाड्या पार्क करतात. त्याचा छोटासा आराखडा मी मुख्यमंत्र्यांना दिला. पोलीस आयुक्त आणि ट्रॅफिकचे जॉइंट सीपीही होते. मी त्यांना काही नमूने दिले” असं राज ठाकरेंनी सांगितलं.
‘त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं बंद झालं’
“साधारणपणे जास्ती आकाराचा दंड आणि जेल याला लोक घाबरतात. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं बंद झालं आहे. काही गोष्टीची शिस्त लावली पाहिजे. नो पार्किंचे बोर्ड लावले. पण त्याकडे लोक पाहत नाही. त्यातील सोपा मार्ग सूचवला आहे. मी सीएम आणि सीपींना सांगितलं. छोटी मैदाने आहेत. त्या मैदानाच्या खाली 500 ते 1000 गाड्यांचं पार्किंग केलं पाहिजे. मैदानं जाणार नाही. तिथेच राहतील. मुलं खेळतील. अशा अनेक गोष्टी होतील. पार्किंग आणि नो पार्किंगच्या फुटपाथला रंग असले पाहिजे. म्हणजे लोकांना कळेल” असं राज ठाकरे म्हणाले.
‘तसे शहरांचेही नियम असतात’
“दोन चाकी वाहनं ट्रॅफिक सिग्नल पाळत नाहीत. अनेक मुंबईकरांना माहीत आहे. रात्री 12 वाजता सिग्नल चालू असले, तर गाड्या थांबायच्या. आता दुपारच्या 12 वाजताही थांबत नाही. ही बेशिस्ती आहे. कायद्याला जुमानलं जात नाही. यातून शहरं उभी राहणार नाही. वाईट पद्धतीच्या सवयी होतील. सरकारने उपाय योजना कराव्या. हाताबाहेर परिस्थिती गेली तर कोणीच काही करू शकत नाही. शाळा, कॉलेजाचे काही नियम असतात तसे शहरांचेही नियम असतात. गाड्या कुठे पार्क कराव्या, कुठे नाही याचे नियम असतात. शहरांचा पार्किंगसाठीचा आराखडा असणं गरजेचं आहे. आता त्याची गरज आहे. हाताबाहेर गेलं आहे. पण अटोक्यात आणता येईल. अजून हाताबाहेर गेलं तर पुढे काहीच करता येणार नाही. याच विषयावर बोलण्यासाठी सीएमला भेटलो होतो” असं राज ठाकरे म्हणाले.