AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांना ठेचून काढा; लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणावर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, थेट CM यांना…

नाशिकमधील लिंगपिसाट अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चांगलेच चर्चेत आहे. घटस्फोटीत, गर्भवती, विवाहित, अल्पवयीन अशा अनेक महिलांवार या भोंदूबाबाने अत्याचार केले आहेत. या प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांना ठेचून काढा; लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणावर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, थेट CM यांना...
राज ठाकरेImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 23, 2026 | 12:40 PM
Share

नाशिकच्या ‘भोंदू बाबा’ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. काही महिलांनी या भोंदूबाबावर लैंगिक अत्याचार, बलात्काराचे आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. लिंगपिसाट अशोक खरातने गर्भवती महिलेला देखील सोडले नाही. तसेच अशोक खरातचे अनेक बड्या नेत्यांसोबत असलेले कनेक्शन देखील समोर आले आहे. आता या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले, “अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र’ हा प्रश्न पडतो.”

पुढे ते म्हणाले, “ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा ‘गीतारहस्य’ सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब ‘तीर्थ’ प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.”

“हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे” असे राज ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे. या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे. पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.”

“पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की. राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल” असे ते म्हणाले.

पोस्टच्या शेवटी राज ठाकरे म्हणाले की, “माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका. मुळात आज महाराष्ट्रात अनेक मुलींचं अपहरण होत आहे. ज्याची आकडेवारी सरकार विधिमंडळात देत आहे. ड्रग्स राजरोस विकली जात आहेत. स्त्रियांच्या शोषणाच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय धोबीपछाड राजकारण बाजूला ठेऊन या प्रकरणाचा छडा लावा. दैवी शक्तीच्या नावाखाली, राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. आणि याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा. तेंव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. तसं केलंत तर आणि तरच तुमच्या भाषणांत तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही.”

Follow Us
भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण...
भोंदू खरात प्रकरणी मोठी अपडेट; कल्पना खरातचा जामीन अर्ज मंजूर, कारण...
ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय पाटलांना आव्हाडांचा थेट इशारा
Jitendra Awhad | ही भाषा तुमचं राजकारण संपवेल; संजय दिना पाटलांना जितेंद्र आव्हाडांचा थेट इशारा
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलां
उगाचंच माझ्या XXX... हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा; संतप्त संजय दीना पाटलांचं थेट पोलीस आयुक्तांना आव्हान
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!