AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS : सर्वांना सूबुद्धी दे, सूड बुद्धी नको, मोदींच्या पंतप्रधान पदाला 12 वर्ष पूर्ण म्हणून मनसेकडून सिद्धिविनायक मंदिरात उपरोधिक पूजा

MNS : नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्ष पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा एक रेकॉर्ड आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सिद्धिविनायक मंदिरात उपरोधिक पूजा आयोजित करण्यात आली होती.

MNS : सर्वांना सूबुद्धी दे, सूड बुद्धी नको,  मोदींच्या पंतप्रधान पदाला 12 वर्ष पूर्ण म्हणून मनसेकडून सिद्धिविनायक मंदिरात उपरोधिक पूजा
MNS
| Updated on: Jun 11, 2026 | 9:36 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर काल एका नव्या विक्रमाची नोंद झाली. सलग 12 वर्ष देशाचं पंतप्रधान भूषवणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम त्यांनी मागे टाकला. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाली म्हणून देशभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली. अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी या खास उपलब्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेने मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाली म्हणून उपरोधिक पूजा केली.

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात मनसेकडून उपरोधिक पूजा आयोजित करण्यात आली होती. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी या पूजेत सहभागी झाले होते. पूजा केल्यानंतर संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्यापासून पळतायत असं तुम्हाला वाटतं का?. “पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्यापासून पळतायत की नाही माहित नाही. पण त्यांचे कार्यकर्ते मात्र पळतायत” असं उत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलं.

किंवा तुम्ही घाबरता

पत्रकार परिषद घेतली नाही याचा अर्थ काय होतो? “जर तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकत नसाल तर एकतर तुमच्याकडे उत्तरं नाहीत किंवा तुम्ही घाबरता असा त्याचा अर्थ होतो” असं देशपांडे म्हणाले. मोदी असेच विक्रम करत राहिले तर देशाचं काय होईल? “आम्ही बाप्पाला हेच म्हटलं, एवढे विक्रम आपल्या पंतप्रधान साहेबांच्या नावावर आहेत. असेच विक्रम घडवायचे आहेत किंवा काय, आमचा गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. आम्ही त्याच्याकडे प्रार्थना केली की, सर्वांना सूबुद्धी दे, सूड बुद्धी कोणाला देऊ नकोस” असं उत्तर देशपांडे यांनी दिलं.

जॉर्जिया मेलोनी यांनी शुभेच्छा संदेशात काय म्हटलं?

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. “भारतासोबत एका विशेष रणनितीक भागीदारीची सुरुवात करताना आनंद होतोय. यामुळे आपल्या देशांना, देशातील जनतेसाठी नवीन संधी निर्माण होतील” असं जॉर्जिया मेलोनी यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान