AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यावेळी शिवतीर्थावर येऊ नका, लवकरच भेटू… वाढदिवसापूर्वीच राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना

राज ठाकरे यांनी १४ जून २०२५ रोजी होणाऱ्या त्यांच्या वाढदिवशी शिवतीर्थावर येऊ नये असे मनसे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. कुटुंबासह मुंबईबाहेर असल्याने भेट होणार नाही, असे स्पष्ट करून त्यांनी लोकोपयोगी कार्य करण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी शिवतीर्थावर येऊ नका, लवकरच भेटू... वाढदिवसापूर्वीच राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 11, 2025 | 4:32 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या १४ जूनला वाढदिवस आहे. या वाढदिवसापूर्वी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज ठाकरेंनी मनसैनिकांना शिवतीर्थावर येऊ नका असे आवाहन केले आहे. तसेच यामागील कारणही त्यांनी सांगितले आहे.

राज ठाकरे यांचे संपूर्ण पत्र

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो,

सस्नेह जय महाराष्ट्र!

येत्या १४ जून २०२५ ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिवशी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजरा का करणार नाहीये ? काही विशेष कारण आहे का ? इत्यादी… पण मनापासून सांगतोय की बस्तर असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या १४ जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका.

गेली अनेक दशकं माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे जणं येता, तुमच्याशी त्या दिवशी बोलणं होत नाही, पण तुमचं दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट हि ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावलं असेल तर तुम्हा सर्वांच अफाट प्रेम ! आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋणी आहे आणि पुढे देखील राहीन. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळे त्याची मला रुखरुख लागेलच!

पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचे दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही.

माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी मानेन. त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू. महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या, असे राज ठाकरेंनी या पत्रात म्हटले आहे.

लोकोपयोगी कार्यक्रम राबवा – राज ठाकरे

दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवावेत, असा सल्ला मनसैनिकांना दिला आहे. तसेच लवकरच मी तुमच्या भेटीला येईन, महाराष्ट्र सैनिकांना भेटायला त्यांचे दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच, असेही राज ठाकरे म्हटले आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.