“जाऊ दे, मरु दे तिला, फुकट तू कशाला…”, आव्हाडांची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल; मनसेकडून पोलखोल

या ऑडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जाऊ दे, मरु दे तिला, तू कशाला बदनाम होतो? असं म्हणत मल्लिकार्जुन पुजारी या कार्यकर्त्याला अनेक शिव्याही घातल्या आहेत.

जाऊ दे, मरु दे तिला, फुकट तू कशाला..., आव्हाडांची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; मनसेकडून पोलखोल
Jitendra awhad
| Updated on: Aug 26, 2024 | 3:53 PM

Jitendra awhad Mallikarjun Pujari Audio Clip : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून ही ऑडिओ क्लिप ट्वीट करण्यात आली आहे. यात जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. जाऊ दे, मरु दे तिला, तू कशाला बदनाम होतो? असा संवाद यात पाहायला मिळत आहे. यावरुन आता राजकारण सुरु झाले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा एक ऑडिओ शेअर केला आहे. यात जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी या व्यक्तीशी संवाद साधताना दिसत आहेत. ही ऑडिओ क्लिप 4 वर्षांपूर्वीची असल्याचे बोललं जात आहे.

ऑडिओ क्लिपमधील संवाद काय?

जितेंद्र आव्हाड : अरे मल्लिकार्जुन तू कुठल्या तरी एका मुलीवरुन एका माणसाला ब्लॅकमेल करतोयस?

मल्लिकार्जुन पुजारी : तुमच्याकडे ते प्रकरण आलं का?

जितेंद्र आव्हाड : अरे माझ्याकडे नाही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल साहेबांपर्यंत ते प्रकरण पोहोचलंय

मल्लिकार्जुन पुजारी : मी त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करत नाही. ती मुलगी आपल्याकडे न्याय मागण्यासाठी आली होती.

जितेंद्र आव्हाड : नको ते उद्योग कशाला करतोस. तो व्यक्ती टी सीरीजचा मालक आहे.

मल्लिकार्जुन पुजारी : साहेब ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती.

जितेंद्र आव्हाड : जाऊ दे मरु दे तिला, फुकट तू कशाला त्यात बदनाम होतो आहेस.

मल्लिकार्जुन पुजारी : मी त्याला काहीही बोललो नाही. उलट तोच मला त्या मुलीला समजून सांगा. गुन्हा दाखल करुन देऊ नका. तो मला नवी मुंबईत येऊन भेटूनही गेला. त्याने मला मी त्या मुलीला सांगतो, असेही सांगितले.

जितेंद्र आव्हाड : तू त्या मुलीमध्ये आणि त्याच्यात पडू नको. त्याला सांग तुझं जे काही आहे ते तू बघ.

संदीप देशपांडेंकडून ट्वीट

जितेंद्र आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारी यांच्यात झालेला हा संवादाचा ऑडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या ऑडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जाऊ दे, मरु दे तिला, तू कशाला बदनाम होतो? असं म्हणत मल्लिकार्जुन पुजारी या कार्यकर्त्याला अनेक शिव्याही घातल्या आहेत. हा व्हिडीओ ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी शप्पथ घेतली होती ना ??? असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ खरा आहे की खोटा, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच हा व्हिडीओ किती वर्षे जुना आहे, या व्हिडीओत संवाद साधणारी व्यक्ती नेमकी कोण, ते नेमके कोणाबद्दल बोलत आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.