AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर माशी शिंकलीच… मुंबईत या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटात होणार लढत; नेमकं असं काय घडलं?

मुंबईतील वार्ड 67 मध्ये मनसे आणि ठाकरे गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंधेरी पश्चिमेकडील या प्रभागात दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कुशल धुरी (मनसे) आणि शरद जाधव (ठाकरे गट) हे एकमेकांविरोधात उभे आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना, हा तिढा कसा सुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अखेर माशी शिंकलीच... मुंबईत या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटात होणार लढत; नेमकं असं काय घडलं?
मनसे- शिवसेना ठाकरे गट
| Edited By: | Updated on: Jan 01, 2026 | 1:54 PM
Share

राज्यात पहिल्यांदाच मनसे (MNS) आणि ठाकरे गटाची (Shivsena UBT) युती झाल्याने या युतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खासकरून मुंबईत ही युती काय चमत्कार करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दोन्ही बंधूंमधील जागा वाटपाचा तिढाही सुटलेला आहे. उमेदवारांनी अर्जही भरले आहेत. आणि दोघेही येत्या 5 तारखेपासून सभांचा धडाका सुरू करणार आहेत. पण त्यापूर्वीच मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीत माशी शिंकली आहे. मुंबईतील 227 पैकी एका जागेवर ठाकरे गट आणि मनसेमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेच. पण या एका जागेचा तिढा का सुटला नाही? याचीही चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईत वार्ड क्रमांक 67 मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. या वार्डातून मनसे आणि शिवसेना ठाकरे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अधिकृत अर्ज भरल्याची माहिती पुढे आली आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेनंतर मुंबई महानगरपालिकेकडून माहिती देण्यात आली. त्यात वॉर्ड क्रमांक 67मध्ये ठाकरे सेना आणि मनसे या दोन्ही उमेदवारांची नावे असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या मतदारसंघातील एक उमेदवार माघार घेणार की या एका मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे दोन उमेदवार रिंगणात

मुंबईच्या प्रभाग क्रमांक 67 मध्ये मनसे आणि ठाकरेंची सेना या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने इथे नेमक काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंधेरी पश्चिमेकडील या प्रभागातून मनसेने कुशल धुरी यांना मैदानात उतरवलं आहे. तर ठाकरेंकडून शरद जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता प्रभाग क्रमांक 67 मध्ये मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा रंगू लागली आहे.

12 उमेदवार मैदानात

या मतदारसंघात एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. भाजपने दीपक कोतेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर समाजवादी पार्टीने प्रकाश कोकरे आणि वंचितने पीर मोहम्मद शेख यांना उमेदवारी दिली आहे. या वॉर्डात मनसे, ठाकरे गट, भाजप आणि वंचित यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. त्यामुळे मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एक संधी…

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या 2 जानेवारी ही शेवटची मुदत आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दोन्हीपैकी एका उमेदवाराला संधी आहे. जागा वाटपात ज्या पक्षाच्या वाट्याला ही जागा आली, त्या पक्षाचा उमेदवार कायम राहिल. आणि दुसऱ्या उमेदवाराला माघार घ्यावी लागणार आहे, असं चित्र आहे. मात्र, उमेदवारी मागे घेतली जाते की मैत्रीपूर्ण लढत होते, हे उद्याच समजणार आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?