AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत मोठा राडा; अमित साटम यांच्या वक्तव्याने मनसैनिक भडकले, भाजपच्या बॅनरला फासलं काळं

mumbai news : मुंबईत मनसैनिक आणि अमित साटम यांच्यातील संघर्ष पेटला आहे. मनसैनिकांनी भांडुपमध्ये काळे झेंडे दाखवले आहेत.

मुंबईत मोठा राडा; अमित साटम यांच्या वक्तव्याने मनसैनिक भडकले, भाजपच्या बॅनरला फासलं काळं
| Updated on: Jul 05, 2026 | 1:24 PM
Share

मुंबईत पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मुंबईतील विविध भागात पावसाचं पाणी साचलं आहे. मुंबईकरांचं मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसादरम्यान भाजप नेते ग्राऊंडवर उतरल्याचे पाहायला मिळाले होते. रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आम्ही घरात बसून पोस्ट लिहित नसून रस्त्यावर उतरून काम करतो, असं म्हणत अमित साटम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं होता. त्यानंतर अमित साटम आणि मनसैनिकांमधील संघर्ष अधिक पेटला आहे.

काही दिवसांपूर्वी अमित साटम यांचा विधीमंडळ परिसरातील दुर्घटनेवर हसण्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी अमित साटम आणि भाजपवर तीव्र शब्दात टीका केली होती. त्यानंतर अमित साटम यांनी मी दोन्ही पक्षांचं मलिद्याचे राजकारण संपवल्याची टीका केली होती. अमित साटम यांनी केलेली टीका मनसेच्या जिव्हारी लागली. त्यानंतर मनसेच्या संदीप देशपांडे यांनीही अमित साटम यांच्या कडक शब्दात समाचार घेतल होता. तुम्ही फिल्डवर आल्यानंतरही अपघात का झाले? असा सवाल करत देशपांडे यांनी अमित साटम यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

मनसैनिकांनी भाजपते मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना भांडुपमध्ये काळे झेंडे दाखवले. त्याचबरोबर त्यांच्या बॅनरला देखील काळे फासले. अमित साटम यांच्या निषेधार्थ अनेक मनसैनिक DAV कॉलेजच्या बाहेर आंदोलन करत होते.

साटम काय म्हणाले होते?

अमित साटम म्हणाले होते की, ‘विरोधक वक्तव्याचा विपर्यास करत असून लक्ष भरकटवत आहेत. खरंतर आम्ही घरात बसून पोस्ट लिहित नाही, तर रस्त्यावर उतरून काम करत आहे. विधानसभेत आवाज उठवला. 2 दिवसांत 7 मनपा अधिकाऱ्यांचं निलंबन केलं. तुम्ही पावसात कधी उद्धव, आदित्य किंवा राज ठाकरे यांना मुंबईच्या रस्त्यावर पाहिले का? मला टार्गेट करण्याचं एकच कारणा आहे. पालिकेतील स्टँडिंग कमिटीतलं २५ वर्षांचं ‘अंडरस्टँडिंग’ (भ्रष्टाचार) आणि मलिदा आम्ही कायमचा बंद केलाय’.

Follow Us
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा