AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांचा थेट मोठा निर्णय, तातडीने सर्व आमदारांना निरोप, मोठ्या घडामोडींना वेग..

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मोठी बंडखोरी होत आहे. तब्बल 6 खासदार आणि 1 आमदाराने बंडखोरी केली. अजूनही काही खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. यादरम्यानच आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांचा थेट मोठा निर्णय, तातडीने सर्व आमदारांना निरोप, मोठ्या घडामोडींना वेग..
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 05, 2026 | 12:31 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ठाकरे गटाच्या तब्बव 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. यासोबतच आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनीही थेट शिवसेना शिंदे गटाची साथ धरली. शिवसेना शिंदे गटात दाखल होताच सचिन आहिर यांना थेट विधान परिषदेचे उपसभापतीपद मिळाले. 6 खासदार गेल्यानंतर जेवढा धक्का उद्धव ठाकरेंना बसला नव्हता, त्यापेक्षा कितीतरी जास्त पट त्यांना सचिन आहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर बसला. एकनाथ शिंदे एका मागून एक मोठे धक्के उद्धव ठाकरे यांना देत आहेत. ठाकरे गटात मोठी बंडखोरी होत आहे. त्यामध्येच गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगत आहेत की, शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. कोणत्याही क्षणी बंडखोरी होऊ शकते. यावरच आता उद्धव ठाकरे यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला.

उद्धव ठाकरे यांनी बंडखोरीच्या मुद्द्यात अधिक सर्तक राहण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बंडखोरी टाळण्यासाठी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांच्याआदेशानंतर पक्षातील सर्व आमदारांसोबत संपर्क साधून त्यांना येत्या मंगळवारी रात्री 7 वाजता बैठकीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पक्षाने ही तातडीची बैठक बोलावली आहे.

पक्षफुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरे स्वत: आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदार फुटणार नाहीत, याची काळजी उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतली जात आहे. सचिन आहिर यांच्यानंतर अजूनही काही आमदार फुटणार का? अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर थेट उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती.

6 खासदारांनी ठाकरे गटातून बंडखोरी करण्यापूर्वीही खासदारांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती. त्यावेळी काही खासदार ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी झाली होती. मात्र, बैठकीत उपस्थित असलेल्या खासदारांनीही मोठी बंडखोरी केली. त्यानंतर या खासदारांच्या मतदार संघात जाऊन उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या आणि यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईत परत येताच थेट सचिन आहिर यांनी बंडखोरी केली.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ