मोहित कंबोज आणि त्यांच्या कुटुंबियांना धोका, तत्काळ सुरक्षा पुरवावी, भाजप आमदार अमित साटम यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Feb 28, 2022 | 1:38 PM

महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि मंत्र्यांविरोधात मोहित कंबोज उघडपणे भूमिका घेत असल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका आहे, त्यांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे.

मोहित कंबोज आणि त्यांच्या कुटुंबियांना धोका, तत्काळ सुरक्षा पुरवावी, भाजप आमदार अमित साटम यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us on

मुंबईः भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून (Mumbai Police) धोका पोहोचवण्याचा कट रचला जात आहे, असा गंभीर आरोप भाजप आमदाराकडून करण्यात आला आहे. मुंबईतील अंधेरीचे भाजप आमदार अमित साटम यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) पत्र लिहिलं आहे. मोहित कंबोज आणि त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट करण्यात येत आहे. तसेच मोहित कंबोज यांच्या जीवालाच धोका आहे, त्यांना तत्काळ सुरक्षा प्रदान केली जावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. यासंदर्भातील एक पत्र आमदार साटम यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.

अनिल साटम यांनी काय लिहिलंय पत्रात?

अमित साटम यांनी मोहित कंबोज यांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा दर्शवणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. त्यांनी लिहिलंय की, मुंबईत ग्राउंड स्थितीवर काम करताना, मला काही गंभीर माहिती समजली आहे. महाविकास आघाडी आणि त्यांच्या मंत्र्यांविरुद्ध मोहित कंबोज सातत्याने आरोप करत असल्यामुळे त्यांना धोका पोहोचवण्याचा, त्यांच्यावर हल्ला करण्याचा किंवा या प्रकरणातून त्यांना बाजूला सारण्याचा एक कट रचला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या घटनेचे अवलंबन करताना आपण सरकार विरोधी टीकांना सकारात्मक दृष्टीने पहायला हवे. मात्र सध्या जेलमध्ये असलेल्या लोकांकडून मुंबई पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने मोहित कंबोज भारतीय आणि त्यांच्या कुटुंबीयांना धोका पोहचवण्याचा कट रचला जात आहे. यात कंबोज यांची पत्नी आणि दोन लहान मुलांच्या जीवालाही धोका आहे. त्यामुळे मी विनंती करतो की, मोहित कंबोज आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात यावी. याआधी त्यांना सुरक्षा देण्यात आली होती, मात्र 2020मध्ये ती काढून घेण्यात आली आहे. अशा प्रकारचा इशारा दिल्यानंतरही काही सुरक्षा देण्यात आली नाही तर पुढील घडणाऱ्या घटनांसाठी सरकार जबाबदार असेल, असा इशाराही आमदार अनिल साटम यांनी दिला आहे.

कोण आहेत मोहित कंबोज?

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात भाजप नेते मोहित कंबोज भारतीय हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मोहित कंबोज यांनीदेखील नवाब मलिक यांच्यावर आरोप केले. नुकतंच ईडीने नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर मोहित कंबोज यांनी तलवार झळकावून या घटनेचा आनंद व्यक्त केला. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहित कंबोज यांनी गेल्या काही दिवसातही नवाब मलिक यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत. नवाब मलिक हे बांग्लादेशातून मुली आणून मुंबईत वेश्या व्यवसाय आणायचं काम करत होते. अशा अनेक मुलींचे आम्ही स्टिंग ऑपरेशन केले आहे, त्याचे व्हिडिओदेखील आमच्याकडे आहेत, असा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि मंत्र्यांविरोधात मोहित कंबोज उघडपणे भूमिका घेत असल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका आहे, त्यांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे.

इतर बातम्या-

IND vs SL: T 20 मध्ये रोहित शर्माला ‘या’ श्रीलंकन गोलंदाजाने बनवलय खेळणं, हवं तेव्हा करतो आऊट