Monsoon Update: काय? थेट अरबी समुद्रातले ढगच गायब? आता पाऊस थेट…चिंता वाढवणारा स्कायनेटचा नवा अंदाज!

Monsoon Update: २० जूननंतर मान्सून हळूहळू सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आता स्कायनेटने दिलेल्या नव्या अंदाजने अनेकांची चिंता वाढली आहे. नेमका पाऊस कधी पडणार? जाणून घ्या...

Monsoon Update: काय? थेट अरबी समुद्रातले ढगच गायब? आता पाऊस थेट...चिंता वाढवणारा स्कायनेटचा नवा अंदाज!
Weather Update
Image Credit source: Freepik
| Updated on: Jun 16, 2026 | 4:21 PM

मान्सूनने यंदा कोकणातच मुक्काम केल्याचे चित्र आहे. तळकोकणापर्यंत पोहोचलेले मान्सूनचे ढग अचानक अरबी समुद्रातून गायब झाले असून, पावसाने पूर्णपणे विराम घेतला आहे. १५ ते २० जूनपर्यंत मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असे आधीचे अंदाज सध्या तरी खोटे ठरत आहेत. कडाक्याचे ऊन आणि उष्णतेच्या तीव्र लाटेने राज्यातील जनजीवन हैराण झाले आहे. आता स्कायनेटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नागरिकांची चिंता वाढवली आहे. कारण त्यांच्या अंदाजे या संपूर्ण महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही.

विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेचा तडाखा

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील ४८ तास उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मुंबईसह ठाणे, पालघरसह उपनगरांमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. पावसाचा कोणताही अंदाज नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात ढगाळ वातावरण आहे, तरीही पाऊस मात्र अजूनही दिसत नाही. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही सध्या शांत आहेत. उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर निर्माण झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभावही फारसा नाही.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

मान्सून रखडल्याने महाराष्ट्रातील बळीराजाची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, २० जून नंतर हळूहळू मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात मान्सून पूर्णपणे स्थिर होण्यासाठी जुलैचा पहिला किंवा दुसरा आठवडा जावा लागेल.

क्षेत्रनिहाय अंदाज:

मुंबई, ठाणे, पालघर: हलक्या सरींची शक्यता

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा: मध्यम स्वरूपाचा पाऊस

विदर्भ (नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली): गडगडाटासह पावसाची शक्यता

मराठवाडा व मध्य महाराष्ट्र: पावसाची शक्यता अत्यंत कमी, कोरडेच राहणार

ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाची आशा?

हवामान विभागाने यंदा एकूण पाऊस चांगला होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इंडियन ओशन डायपोल (हिंदी महासागरातील तापमानातील चढ-उतार) सक्रिय झाल्यास एल निनोचा प्रभाव कमी होऊन पावसाला चांगली गती मिळू शकते. अशी स्थिती निर्माण झाल्यास थंड वारे वाहू लागतील आणि मान्सून अधिक सक्रिय होण्यास मदत होईल.

Follow Us