AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रासाठी मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी, अनुकूल वातावरणानंतर या तारखेला दाखल होणार नैऋत्य मोसमी वारे

imd mansoon prediction about konkan: अरबी समुद्र खवळलेला असल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग ही वाढला आहे. आता समुद्राचा रंग देखील बदलला आहे. समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहे. तळकोकणातून महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होते. त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रासाठी मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी, अनुकूल वातावरणानंतर या तारखेला दाखल होणार नैऋत्य मोसमी वारे
mansoon
| Updated on: Jun 01, 2024 | 10:28 AM
Share

राज्यात आणि देशात सध्या तापमान प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सर्वांना मान्सूनचे वेध लागले आहे. यंदा मान्सूनची वाटचाल चांगली सुरु आहे. अंदमान निकोबारमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झाला. १८ मे रोजी अंदामान निकोबारमध्ये मान्सून आल्यानंतर त्याची वाटचाल केरळकडे सुरु झाली. केरळमध्ये मान्सून वेळेआधी आला. १ जून ऐवजी ३० मे रोजी मान्सून आला. त्यानंतर महाराष्ट्रतील कोकणात मान्सूनचे वेध लागले. महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आहे. मान्सून कोकणात वेळेआधीच दाखल होणार आहे. कोणात मान्सून वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

कधी येणार कोकणात मान्सून

कोकण किनारपट्टीवरती मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. येत्या 3 जूनला गोव्यात तर 4 जूनला मान्सून कोकणात येण्याचा अंदाज आहे. दोन जूनपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळणार आहे. यंदा मान्सून वेळेआधीच येणार आहे. तसेच सरासरीपेक्षा जास्त कोसळणार आहे. राज्यात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला आहे.

ही निर्माण झाली लक्षणे

अरबी समुद्र खवळलेला असल्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग ही वाढला आहे. आता समुद्राचा रंग देखील बदलला आहे. समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहे. तळकोकणातून महाराष्ट्रात मान्सूनची एन्ट्री होते. त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा तडाखा

उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा तडाखा सुरु आहे. उष्माघातामुळे शुक्रवारी एका दिवसात 4 राज्यांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक 17 जणांना उष्मघातामुळे मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये 14, ओडिशामध्ये 5 आणि झारखंडमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 72 तासांत 182 लोकांचा मृत्यू हा उष्णतेच्या लाटेने झाल्याची माहिती देण्यात आली. अयोध्येत 3 दिवसांत 18 बेवारस मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते, त्यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात असल्याचे सांगितले गेले.

शनिवारी देशात कुठेही उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. पण राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडिशा आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.