AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाथाभाऊंच्या जावयाचे पाय खोलात, 7 ते 8 महिलांनी घेतली पोलिसात धाव, संबंध ठेवतानाचे व्हिडिओ…

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हेच नाही तर काही महिला यांनी खेवलकरच्या विरोधात पोलिसात धाव घेतली आहे. फक्त जावईच नाही तर रोहिणी खडसे यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.

नाथाभाऊंच्या जावयाचे पाय खोलात, 7 ते 8 महिलांनी घेतली पोलिसात धाव, संबंध ठेवतानाचे व्हिडिओ…
Pranjal Khewalkar Rohini Khadse
| Updated on: Aug 26, 2025 | 10:20 AM
Share

पुणे पोलिसांनी खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याच्यासह इतर काही जणांना ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत काही महिलांचा देखील समावेश होता. या रेव्ह पार्टीनंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली. सातत्याने गंभीर आरोप ही केली जात आहेत. खेवलकरच्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो आणि व्हिडीओ सापडली आहेत. पती प्रांजल खेवलकरला पोलिसांनी अटक केल्यानंतर रोहिणी खडसे या पतीला वाचवण्यासाठी मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले.

आता एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. प्रांजल खेवलकरवर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या संपर्कात 7 ते 8 महिला असल्याची माहिती मिळतंय. या महिलांचे प्रांजल खेवलकरने संबंध ठेवताना, सहमती नसताना, चोरून ऑडिओ रेकॉर्डिंग केले असल्याचा आरोप केला आहे. त्याचं बरोबर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोज देखील पोलिसांना मिळाली आहेत.

आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटोज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग असणाऱ्या महिलांपैकी 7 ते 8 महिलांनी पोलिसांशी संपर्क केल्याची माहिती मिळतंय. सदर महिला भयभीत झाल्या असून, पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क करत असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे आता हे स्पष्ट आहे की, प्रांजल खेवलकरच्या अडचणी कमी व्हायच्या सोडून वाढणार आहेत. यावर अजून रोहिणी खडसे यांनी काही भाष्य केले नाहीये. रोहिणी खडसे यावर काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

प्रांजल खेवलकरला पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. त्यानंतर या पार्टीतील काही व्हिडीओही पुढे आली. हेच नाही तर अशाप्रकारच्या पार्टीमध्ये मुलींना चित्रपटात काम देतो म्हणून आणले जायचे आणि त्यांच्यावर अत्याचार केली जात असल्याचा आरोप राज्य महिला आयोगाने केला. काही व्हिडीओंमध्ये स्वत: खेवलकर दिसत असल्याचा दावा महिला आयोगाने केला. आता त्या आरोपांनंतर महिलांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस अजून कोणते गुन्हे खेवलकर दाखल करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.