AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रांजल खेवलकर प्रकरणात महिला आयोगाने उडी घेताच रोहिणी खडसे संतापल्या, गंभीर आरोप, सगळं स्क्रीप्टनुसार

खराडीमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केली. ज्यानंतर राजकिय भूकंप आला. रोहिणी खडसे या पतीच्या बचावासाठी मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय.

प्रांजल खेवलकर प्रकरणात महिला आयोगाने उडी घेताच रोहिणी खडसे संतापल्या, गंभीर आरोप, सगळं स्क्रीप्टनुसार
Rohini Khadse and Rupali Chakankar
| Updated on: Aug 06, 2025 | 1:07 PM
Share

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. ज्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. प्रांजल खेवलकरवर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत खेवलकरच्या मित्रांसोबत काही मुली देखील सापडल्या. आता त्यावरून वाद वाढलाय. प्रांजल खेवलकरसोबत या प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. मात्र, खेवलकरच्या वकिलांनी अजूनही कोर्टात जामिनासाठी अर्ज केला नाहीये.

आता या प्रकरणात थेट राज्य महिला आयोगाने उडी घेतलीये. या प्रकरणातील आव्हाल हा मागवण्यात आलाय. शिवाय प्रांजल खेवलकरने 28 वेळा स्वत:च्या नावाने हॉटेल बुक केल्याचे म्हटले असून प्रांजल खेवलकर यांनी परप्रांतीय मुलींना बोलावले होते आणि हे मोठे रॅकेट असू शकते म्हटले आहे. बीडमधील एका बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने महिला आयोगाला याबाबत पत्र दिले आहे. आता यावरून रोहिणी खडसे यांनी जोरदार निशाणा हा साधलाय. यासोबतच काही प्रश्नचिन्हही उपस्थित केली आहेत

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले आहे. मुद्दा क्र. 1 ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.

मुद्दा क्र. 2 राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले आहेत. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ?, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

मुद्दा क्र. 3 राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले? इतके कसे कार्यतत्पर झाले? आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे, असे रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मुळात म्हणजे रोहिणी खडसे असो किंवा रूपाली चाकणकर दोघीही कायमच एकमेकींवर टीकी करताना दिसतात.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.