AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला मोठा धक्का, पुण्यात सरचिटणीसांसह 100 पदाधिकारी देणार राजीनामा

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्यासह शंभरहून अधिक पदाधिकारी येणाऱ्या काळात राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेसला मोठा धक्का, पुण्यात सरचिटणीसांसह 100 पदाधिकारी देणार राजीनामा
congress
| Updated on: Mar 17, 2025 | 8:53 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी रामराम करत सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. आता महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा राज्यात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. यात पुणे देखील यात मागे राहिलेले नाही. काही दिवसांपूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेसला देखील गळती लागल्याची चर्चा पुण्यात रंगली आहे. त्यातच आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह अन्य १०० पदाधिकारी राजीनामा देणार आहेत.

येत्या २-३ दिवसात राजीनामा देणार

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि एनएसयुआय पुणे सरचिटणीस कृष्णा साठे यांच्यासह पक्षातील अन्य १०० पदाधिकारी येत्या २-३ दिवसात राजीनामा देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील पदाधिकारी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटात अनेक पदाधिकारी प्रवेश घेत आहेत.

काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार

त्यातच काही दिवसांपासून सुरवसे पाटील हे काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार अशी चर्चा रंगली होती. आता या पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित झाली आहे. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये सुरवसे पाटील यांच्यासह युवक काँग्रेसचे १०० पदाधिकारी राजीनामा देणार आहेत. हे सर्वजण दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या आठवड्यात हे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...