AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध,पळून जाण्याची दिली धमकी, आईने पोटच्या लेकीचा स्कार्पने गळा आवळला

परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने अमृता हीची तिच्या आईनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर उल्हासनगरात खळबळ उडाली आहे.

परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध,पळून जाण्याची दिली धमकी, आईने पोटच्या लेकीचा स्कार्पने गळा आवळला
honor killing
| Updated on: Jul 27, 2026 | 6:27 PM
Share

मुंबई ( मयुरेश जाधव ) – आपल्या मुलीचे शेजारीच राहणाऱ्या परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने संतप्त झालेल्या आईने आपल्या पोटच्या मुलीची स्कार्पने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीचे रात्री दीड वाजता तिच्या आईसोबत भांडण झाले होते. त्यानंतर या मुलीने पळून जाण्याचा बेत सांगितल्याने संतापलेल्या आईने तिच्याच स्कार्पने या मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर या मुलीच्या वडीलांनी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटनाक्रम स्वत:च पोलिसांना सांगितला.

उल्हासनगरच्या कॅम्प १ मधील भैय्यासाहेब आंबेडकरमध्ये राहणारी अमृता गरुड या १९ वर्षीय तरुणीचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका परजातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना तिची आई आशा गरुड हीने विरोध केला होता. याच कारणावरून रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अमृता आणि तिच्या आईचे भांडण झाले. वादानंतर अमृता हीने आपण आता घर सोडून जाणार असे आईला सांगितले. त्यानंतर आईने रागाच्या भरात स्कार्पने आपल्या पोटच्या मुलीचा गळा आवळून तिचा खून केला. या घटनेनंतर अमृता हीच्या वडिलांनी स्वतः उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आशा गरुड हीला अटक केली.

रात्री आईशी कडाक्याचे भांडण झाले

अमृता हीचे शेजारीच राहणाऱ्या एका परजातीतील तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या घरच्यांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. रात्री दीड वाजता अमृता हीचे आईशी कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर अमृता हीने आपण पळून जाऊ असे म्हटल्याने आईने तिचा रागाच्या भरात स्कार्पने गळा आवळला. त्यानंतर तिच्या वडीलांनी पोलिस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार सांगितल्याचे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी सांगितले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार