पुण्यातील माळशेजमध्ये राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांची बैठक; सूत्रांची माहिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुण्यातील एका अधिवेशनाला येण्यापूर्वी खासदार अमोल कोल्हे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात माळशेज घाटातील एका रिसॉर्टमध्ये गोपनीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुण्यातील माळशेजमध्ये राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांची बैठक; सूत्रांची माहिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 12:28 PM

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. परंतु दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांकडून विलीनीकरणाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा दिलेला जात नाहीए. विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची पुण्यातील माळशेज घाटातील एका रिसॉर्टमध्ये गोपनीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांच्या बैठकीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पुण्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूरमध्ये राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनासाठी राजकीय नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. या अधिवेशनाला येण्यापूर्वी खासदार अमोल कोल्हे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात माळशेज घाटातील एका रिसॉर्टमध्ये गोपनीय चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा थांबलेली असताना या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. या चर्चेत नेमके कोणते विषय झाले आणि त्याचा राष्ट्रवादीच्या राजकीय समीकरणांवर काही परिणाम होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली.

Loading...

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us