AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकर यांना मोठा दणका! उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यापूर्वीच पहिला धक्का, थेट 6 हजार..

शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वीच खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा दणका बसताना दिसत आहेत. त्यांच्या या निर्णयाने धाराशिवकर यांच्यामध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळत आहे. सोशल मीडियावर ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात वातावरण आहे.

ओमराजे निंबाळकर यांना मोठा दणका! उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यापूर्वीच पहिला धक्का, थेट 6 हजार..
Omraje Nimbalkar
| Updated on: Jun 19, 2026 | 6:46 AM
Share

शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या 6 खासदारांनी वेगळा गट निर्माण करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिले. यात राज्यातील वेगवेगळ्या भागातील खासदार आहेत. पक्षाचा मिळत नसलेला पाठिंबा आणि मतदार संघाला न मिळणाऱ्या निधीच्या पार्श्वभूमीवर हे खासदार पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगण्यात आले. काल दिवसभर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या. शिवसेना ठाकरे गटाकडून तात्काळ पक्षातील सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आले. आज बैठक दिल्लीत होत आहे. या बैठकीला सर्व खासदारांना उपस्थित राहवे लागणार आहे, तसे आवाहन पक्षाकडून करण्यात आले. आता हे 6 खासदार बैठकीला उपस्थित राहणार का? यावर काही वेळातच उत्तर मिळेल. बंडखोरी करणाऱ्या या 6 खासदारांच्या यादीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे.

ओमराजे निंबाळकर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा कालपासून रंगताना दिसली. यादरम्यानच ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, मी दिल्लीत नाही तर पुण्यात आहे. मात्र, यावेळी ठाकरे यांच्यासोबतच राहणार का? यावर बोलणे ओमराजे निंबाळकर यांनी टाळले. ज्यामुळे आता ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यादरम्यानच धाराशिवकर या निर्णयानंतर ओमराजे निंबाळकर यांना नाकारताना दिसत आहेत. रील स्टार ओमराजेंना नेटकऱ्यांनी नाकारल्याचे दिसतंय. एका दिवसात ओमराजेंना सोशल मीडियावर 6 हजार फॉलोअर्सने अनफॉलो केले. हा ओमराजेंना मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वीच ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे.

ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर ओमराजेंना नेटकऱ्यांकडून संतापजनक कमेंट केल्या जात आहेत. पक्षांतराच्या चर्चेनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांना संतापजनक कमेंटला सामोरे जावे लागत आहे. एका दिवसात जवळपास 6 हजार फॉलोअर्सने केले त्यांना अनफॉलो केले. ओमराजे निंबाळकर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने व्हिप जारी केल्यानंतर आज ओमराजे निंबाळकर दिल्ली येथे बैठकीला उपस्थित राहणार का ? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. सतत सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोवर्सची संख्या कमी होत आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी