सर्वात मोठी बातमी! पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर घडामोडी वाढल्या!
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार अजितदादा यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार पार्थ पवार हे खासदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्यासोबत इतरही अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.

Parth Pawar meets Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार अजितदादा यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार पार्थ पवार हे खासदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्यासोबत इतरही अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा खासदार सुनिल तटकरे यांनी विलिनीकरणावर चर्चा झाली होती, असे विधान केले. त्या विधानानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पार्थ पवार शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार सिल्व्हर ओक या निवास्थानी दाखल झाले आहेत. सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे तसेच इतर नेते उपस्थित आहेत. असे असताना पार्थ पवारही पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे नेमकं काय घडतंय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शरद पवार यांना डिस्चार्ज
शरद पवार यांच्यावर गेल्या दोन दिवासांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कफ झाला होता. आता त्यांची प्रकृती बरी असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. पवार यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता पार्थ पवार हे शरद पवारांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करण्यासाठी गेल्याचे बोलले जात आहे.
सुनिल तटकरे नेमकं काय म्हणाले होते?
सुनिल तटकरे यांनी विलिनीकरणावर भाष्य केलं. अजितदादा हयात असते तर आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असत्या. विलिनीकरणावर चर्चा झाली होती, असं तटकरे म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी एकत्रिकरण किती गरजेचे आहे, हे नव्याने सांगण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असल्याने हा विषय संपावा म्हणून आता तटकरे यांनी पुन्हा एकदा समोर येत विलिनीकरणाचा मुद्दा संपलेला आहे. विलिनीकरणावर चर्चा नाही, असं नव्याने स्पष्ट केलंय. परंतु तरीदेखील आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चेला नव्याने हवा मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.