बंडखोर खासदार थेट सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात, रात्री 12 वाजता थेट एन्ट्री, उद्धव ठाकरेही..

शिवसेना ठाकरे गटातून 6 खासरादांनी बंडखोरी केली. त्यानंतर त्यांना सुरक्षितस्थळी ठेवण्यात आल्याची माहिती मिळत होती. ओमराजे निंबाळकर सोडले तर इतर खासदार कुठे आहेत, हे कोणाला माहिती नव्हते. सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात एका पक्षांतर केलेल्या खासदाराचे आगमन झाले.

बंडखोर खासदार थेट सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात, रात्री 12 वाजता थेट एन्ट्री, उद्धव ठाकरेही..
Supriya Sule daughter wedding
| Updated on: Jun 21, 2026 | 11:08 AM

ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली. त्यापैकी खासदार ओमराजे निंबाळकर सोडले तर इतर 5 खासदार नक्की कुठे होते, याबाबत माहिती नव्हती. शिवसेना शिंदे गटाकडून या 5 खासरादांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. स्वतंत्र गट स्थापनेबद्दल त्यांनी यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांना पत्रही दिले. त्यात ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे. शिदें गटाच्या ऑपरेशन टायगरला अयशस्वी करण्यासाठी सगळी प्रयत्न ठाकरे गटाकडून केली जात आहेत. कालच ओमराजे निंबाळकर यांची मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी भेट घेतली, हेच नाही तर त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केल्याचे सूत्रांकडून कळतंय. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनीही शिवसेना ठाकरे गटासोबत बंडखोरी केली. त्यांनीही शिवसेना शिंदे गटाची साथ दिली. संजय दिना पाटील हे दिल्लीत असल्याचे कळत होते. इतर 5 खासदारांसोबत असल्याची माहिती होती.

काल मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये खासदार आणि एनसीपीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या मुलीचे लग्न पार पडले. या लग्नात अचानकच बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे ज्या लग्नात संजय दिना पाटील हे पोहोचले होते, त्याच लग्नात उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. एका वेगळ्या आणि खास स्टाईलमध्ये बंडखोर खासदार संजय दिना पाटील पोहोचले. संजय दिना पाटील यांना पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण बंडखोरी केलेल्या खासदारांना सुरक्षितस्थळी शिंदे गटाकडून ठेवण्यात आले होते.

संजय दिना पाटील यांना बघताच फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफरने त्यांना थांबण्यास सांगितले. मात्र, यावेळी ते फक्त हात दाखवून आणि आभार मानून पुढे निघून गेले. शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीला व्हिप जारी करूनही गैरहजर राहणाऱ्या खासदारांना नोटीस जारी करण्यात आली. सात दिवसांत बैठकीला गैरहजर राहण्याचे कारण त्यांना विचारण्यात आले. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातून दावा केला जात आहे की, ऑपरेशन टायगर यशस्वी झाले. रात्री 12 वाजता खासदार संजय दिना पाटील रात्री 12 वाजता सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात पोहोचले.

खासदार संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी गट स्थापन केला. फुटीर खासदार दिल्लीत असल्याची चर्चा असतानात सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात अचानक संजय दिना पाटील पोहोचले. सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात अनेक प्रसिद्ध लोकांनी हजेरी लावली. राजकीय, बॉलिवूड, क्रिडा अशी अनेक क्षेत्रातील प्रसिद्ध लोक पोहोचली होती.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us