AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का, थेट गोकुळ मुद्द्यात घरचा आहेर, एकनाथ शिंदे..

गोकुळच्या मुद्द्यावर वाद चिघळला आहे. सतेज पाटील कोल्हापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता महायुतीमधील वाद हा पुढे आला. शिंदेंच्या शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केल्याने महायुतीला धक्का बसला.

शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का, थेट गोकुळ मुद्द्यात घरचा आहेर, एकनाथ शिंदे..
Eknath Shinde Gokul MilkDevendra Fadnavis
| Updated on: Nov 05, 2026 | 1:59 PM
Share

गोकुळ संघावर राज्य सरकारने चार संचालक नेमले आहेत. ज्यानंतर जोरदार टीका केली जात आहे. विरोधकांकडून टीका होत असतानाच सतेज पाटील यांनीही गंभीर आरोप केले. सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांनी नाकारले, कोर्टात दिलासा मिळणार नाही, यानंतर मंत्रिमंडळात यांनी आदेश काढल्याचे त्यांनी म्हटले. सतेज पाटील यांनी सरकारच्या या निर्णयानंतर प्रतिक्रिया देत थेट मोठी घोषणा केली. हेच नाही तर कोल्हापूरमध्ये मोठ्या मोर्चाची घोषणा केली. 9 तारखेला हा मोर्चा काढला जाणार आहे. सतेज पाटील आणि विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोकुळ संघ ताब्यात घेण्याचा हा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला. गोकुळ संघावर चार संचालक का नेमले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सतेज पाटलांकडे बहुमत असताना सरकारने ही नेमणूक केल्याने सर्व गणितच फिसकले.

त्यातच आता गोकुळच्या मुद्द्यावरून महायुतीमधील धुसपूस पुढे येत आहे. गोकुळमध्ये शासन नियुक्त चार सदस्य निवडीवरून शिवसेना नाराज आहे. लोकशाही मार्गाने जे सदस्य निवडून आले आहेत, त्याचा आपण स्वीकार आणि जो जनतेने कौल दिला आहे त्याचा आपण सन्मान केला पाहिजे, असे थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे म्हणणे आहे.

भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेशी शिवसेना सहमत नाही, असे स्पष्ट मत शिवसेनेने म्हटल्याचे विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यामुळे आता पुन्हा महायुतीमधील वाद पुढे आला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपा यांच्यात कमालीचा वाद उफाळला आहे. पदवीधर निवडणुकीवरून वाद उफाळून आला.

आता गोकुळवरून महायुतीत हालचाली वाढल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केली. गोकुळमध्ये जे सदस्य लोकशाही मार्गाने निवडून आले, ते स्वीकारले पाहिजे, अशी शिंदेंची भूमिका आहे. चार संचालक गोकुळवर नियुक्त केल्याने दोन्ही पक्षातील वाद हा चांगलाच वाढताना दिसत आहे. यावर आता नक्की काय तोडगा निघतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. राहुल गांधी यांनीही यावर भाष्य केले होते.

Follow Us
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!