AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने राहुल गांधींचं चॅलेंज स्वीकारलं; SIR वर चर्चा करण्यासाठी तयार…अमित शहांनी फक्त ठेवली एक अट

भाजपने राहुल गांधींच्या चर्चेचं चॅलेंज स्वीकारलं. SIR वरून चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे अमित शहा यांना राहुल गांधी यांना सांगितलं. यावेळी अमित शहांनी एक अट देखील ठेवली.

भाजपने राहुल गांधींचं चॅलेंज स्वीकारलं; SIR वर चर्चा करण्यासाठी तयार...अमित शहांनी फक्त ठेवली एक अट
amit shahImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 2:12 PM
Share

देशात मतचोरी आणि एसआयआरच्या मुद्द्यावरून रान पेटलं आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात हजारो लोकांचे मोर्चे काढले जात आहेत. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेचं आव्हान दिलं होतं. परंतु राहुल गांधी यांचं चॅलेंज अमित शहा यांनी स्वीकारलं. राहुल गांधी यांनी एक पत्र लिहावं. त्यातून संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करावी, असं अमित शहा यांनी राहुल गांधींना म्हटलं.

अमित शहा म्हणाले, ‘पॉन्डिचेरीत भाजपच्या सरकारची स्थापना झाली आहे. याचा धक्का राहुल गांधींना बसला आहे. त्यामुळे पराभवाचं खापर हे एसआयआर वर फोडत आहेत. 2014 मध्ये एसआयआर होते का…त्यावेळी तुमचा सुपडासाफ झाला. 2019 मध्ये एसआयआर कुठे होतं. तेव्हाही पराभव झाला. 2024 साली देखील एसआयआर नव्हतं. त्यावेळी देखील तुमचा पराभव झाला. हरियाणा, महाराष्ट्रातही एसआयआर नव्हतं. त्यानंतरही सर्व ठिकाणी पराभूत झाले. आता हे म्हणतात की,  तेरा करोड मतदार वगळले. परंतु या मंचावरून राहुल गांधींना चॅलेंज करतो. ते चर्चेसाठी नरेंद्र मोदींना चॅलेंज देताहेत. परंतु इकडे मोदींजींची गरज नाही. चर्चा करायची असेल, तर तुम्ही एक पत्र लिहा. त्यात संसदेत विशेष अधिवेशनाची बाब नमूद करा. आम्ही एसआयआरवर संसदेतील विशेष अधिवेशनात चर्चा करण्यासाठी तयार आहोत. आम्ही चर्चा करू. सर्व प्रकारच्या मुद्द्यावर चर्चा करू. परंतु तुम्ही खोटे बोलणे बंद करावे’.

‘आज मी हरियाणाच्या सभेतून देशाच्या जनतेला सांगतो की, दीड करोड मतदार वगळल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. याचं ब्रेकअप काय आहे…2.8 कोटी नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. ज्यांचा मृत्यू झाला, ते मतदान करू शकतात का? सव्वा सहा कोटी लोक हे दुसऱ्या राज्यात गेले. त्यांचं मतदान पुन्हा राहणार आहे का…एक कोटी लोकांचं नाव हे तीन हून अधिक लोकांची नावे आहेत. तीन ठिकाणी नाव असताना दोन जागांवर नाव वगळले जाणार ना…आता तीन कोटी लोक आहेत. जे निवडणूक आयोगासमोर येतच नाही. कारण ते घुसखोर आहेत. या घुसखोरांसाठी काँग्रेस आंदोलन करत आहे. मी सांगतो की, भाजपचा संकल्प आहे की, आम्ही घुसखोरांना शोधणार आहोत. त्यांना देशाच्या बाहेर काढणार आहोत. त्यांची लोकशाही बचावची रॅली नसून घुसखोर बचावची रॅली आहे. त्यामुळे आम्ही मतदारयादी दुरुस्त करण्यास सांगितलं. निवडणूक आयोग हे एसआयआर करत होतं. त्यावेळी काँग्रेसचे बीएलए काय करत होते. त्यांनी मतदारांची मदत केली नाही, असे अमित शहा पुढे म्हणाले.

Follow Us
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!