AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोकुळवर चार संचालकांची नियुक्ती का? मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, नाही तर निवडणूकच…

गोकूळ दूध संघातील संचालक नियुक्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. निवडणुकीत बहुमत नसल्याने चेअरमन निवडीचा पेच निर्माण झाला. पुन्हा निवडणूक किंवा प्रशासकीय राजवट टाळण्यासाठी सरकारने चार संचालक नेमले, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, काँग्रेस नेते सतेज पाटील आणि राहुल गांधींनी याला 'गोकूळ बळकावण्याचा डाव' म्हणत तीव्र आक्षेप घेतला आहे.

गोकुळवर चार संचालकांची नियुक्ती का? मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, नाही तर निवडणूकच...
CM Devendra FadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 2:16 PM
Share

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कुणालाही बहुमत मिळालं नाही. त्यामुळे गोकूळमध्ये चेअरमन निवड होणं कठिण झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गोकूळमध्ये चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. निवडून येता येत नाही म्हणून आडमार्गाने गोकूळ बळकावण्याचा हा डाव आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गोकूळवर संचालक नेमले नसते तर गोकूळची पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 13 जागा जिंकूनही कोरम पूर्ण होत नाही. त्यामुळे चेअरमन निवडता येत नाही. चेअरमन निवडण्यासाठी किमान 14 सदस्यांची गरज आहे. त्यामुळे कायदेशीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. चेअरमन निवडीसाठी दोन तीन वेळा बैठक झाली आणि प्रत्येकवेळी कोरम पूर्ण नसेल तर निवडणूकच रद्द होईल. म्हणून सरकारने चार सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काही जण म्हणतात हा निर्णय टिकणार नाही. पण आम्ही अॅडव्होकेट जनरल यांचं मत विचारात घेऊनच हा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणारा…

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गोकूळच्या निवडणुकीवर ट्विट करून ही व्होट चोरी असल्याचं म्हटलं आहे. त्यावरही फडणवीस यांनी ट्विट केलं. राहुल गांधींवर काय परिस्थिती यावी? पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणारा व्यक्ती एका छोट्या निवडणुकीवर ट्विट करत आहे. गोकूळमध्ये फक्त साडेचार हजार मतदार आहेत. पण त्यासाठी राहुल गांधींना दिल्लीत बसून ट्विट करावे लागत आहे. हा राष्ट्रीय मुद्दा नाही. पण राहुल गांधी यातही पडत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

काय आहे नियम?

गोकूळमध्ये 25 सदस्य संख्या आहे. महाराष्ट्र सहकारी कायदा आणि गोकूळच्या बायलॉजनुसार बहुमतासाठी 14 सदस्य आवश्यक आहे. सतेज पाटील यांच्याकडे 13 सदस्य आहेत. तर महायुतीकडे 12 सदस्य आहे. 14 सदस्य असल्याशिवाय कोरम पूर्ण होत नाही. कोरम पूर्ण होत नसेल तर चेअरमन निवडता येत नाही, असा नियम आहे. चेअरमन निवडीसाठी एक मिटिंग झाली. त्यात फक्त 13 सदस्य उपस्थित होते. महायुतीच्या 12 सदस्यांनी दांडी मारली. त्यामुळे कोरम पूर्ण न झाल्याने मिटिंग रद्द करण्यात आली. तसेच चेअरमनची निवड झाली नाही. दोन तीन मिटिंग अशाच रद्द झाल्या तर थेट गोकूळवर प्रशासक नेमता येतो. त्यानंतर निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुका टाळता याव्यात म्हणून सरकारने चार सदस्य नियुक्त करण्याचा मधला मार्ग काढल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी