ट्रम्पच नाव घ्यायला या सरकारची हातभर फाटते, हा शब्द कापायचा नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल

"संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळेच काय झालं? 50 वर्षापूर्वी 'सामना' चित्रपट आलेला. त्यात प्रश्न होता, मारुती कांबळेच काय झालं? तसा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे, कृष्णा आंधळेच काय झालं?. मुख्य साक्षीदार आहे, त्याला कुठे गायब केलं? काय आहे कळून द्या"

ट्रम्पच नाव घ्यायला या सरकारची हातभर फाटते, हा शब्द कापायचा नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut
| Updated on: Jul 30, 2025 | 10:41 AM

“काय सुरु आहे हे तुम्हाला माहित आहे. वसई-विरार महानगर पालिकेच्या तत्कालिन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर नियमबाह्य पद्धतीने बसवण्यात आलं. दादा भुसे यांचं आग्रह होता, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती. पण एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. आता ज्याअर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातीला एका मंत्र्याने नियुक्ती केलेल्या आयुक्तावर. याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात. कारण तो अधिकारी नेमण्याच काम दादा भुसे यांनी केलं अशी चर्चा आहे” असं संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

“महाराष्ट्रात नवीन कायदा आला आहे. फडणवीस Act. समज द्या आणि सोडून द्या. काही मंत्र्यांना काल समज दिली आणि सोडून दिलं. हा फडणवीस Act आहे. बाकी सगळे जे असतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, भ्रष्टाचार विरोधी कायद्याखाली, जनसुरक्षा कायद्याखाली अटका होतील. पण मंत्रिमंडळातले जे अपराधी आहेत, माणिक कोकाट, शिरसाट, संजय राठोड असतील अन्य कोणी असतील. ज्यांची जागा तुरुंगात असायला पाहिजे ते मंत्रिमंडळात आहेत. याचं कारण महाराष्ट्रात फडणवीस Act लागू आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

टेबलावरच्या फायली पोलिसांकडे कधी जाणार?

शिंदेभोवीत फास आवळला जातोय का? या प्रश्नावर राऊत म्हणाले की, “नक्कीच तस दिसतय. त्यावर याक्षणी मत व्यक्त करणं योग्य नाही. कारण हे सगळं दबावाचा राजकारण आहे. आता बरेचशे लोक अटक केलेत. अमित साळुंखे झारखंड मद्य घोटाळा हे सगळ पाहता मिंधे गटाच्या लोकांना कोणीतरी इशारा देतय. याद राखा हालचाल केली तर, टेबलावरच्या फायली पोलिसांकडे कधी जाणार हे पहाव लागेल”

अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात?

माणिकराव कोकाटे 20 ते 22 मिनिट रमी खेळत होते, असा अहवाल आहे. त्यावर राऊत म्हणाले की, “अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात? किंवा विधानसभा अध्यक्ष किती किंमत देतात? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएकडे धुळ्यात खोलीत दीडएक कोटी 80 लाख रुपये सापडले. त्याच्याधी 10 कोटी रुपये धुळ्याच्या ठेकेदाराने जमा करुन जालन्याला पाठवले. त्याची चौकशी झाली पाहिजे” “फडणवीस घोषणा करतात. कारवाईचं पुढे काय होतं?. अंदाज समितीचा अध्यक्ष लाचखोर आहे हे उघड झालं. त्याला वाचवताय. हा नवीन फडणवीस Act आलेला आहे. आपल्या लोकांना वाचवायचं बाकीच्यांना तुरुंगात टाकायचं” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

मंत्र्यांचा राजीनामा का नाही?

“सरकार निर्लज्ज असल्यावर राजीनामा कसा होणार?. सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठिंबा देणारं आहे. विरोधी पक्ष काल राज्यपालांना जाऊन भेटला. या भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या फायली घेऊन आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत” असं राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचं भाषण म्हणजे रुदाली

“ऑपरेशन सिंदूर संदर्भात नरेंद्र मोदी यांचं कालच भाषण हे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायच म्हणजे रुदाली रडगाणं होतं. भाषणं काल कोणाची झाली. तुम्ही राहुल गांधी, प्रियकां गांधींच भाषण ऐका. राज्यसभेत खर्गेनी मुद्दे मांडले, त्याचं उत्तर आहे का?. त्याच्यावर अजिबात उत्तर नाही. विरोधी पक्षाने विचारलेल्या कुठल्याही प्रश्नांच उत्तर संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधानांकडे नव्हतं. खोट बोलत आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

या सरकारची का फाटते?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल डोनाल्ड ट्रम्प आणि चीनच नाव घेतलं नाही. पाकिस्तानला युद्धात चीनने सर्वात जास्त मदत केली. त्यांचं नेटवर्क, शस्त्र, विमानं वापरली. त्या चीनच नाव घ्यायला मोदी घाबरले. मोदी म्हणत होते, माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. माझी कोणाशी चर्चा झाली नाही. काल मोदीचं भाषण संपल्यावर ट्रम्प म्हणाले मी युद्ध थांबवलं. पण ट्रम्प यांचं नाव घ्यायला या सरकारची का फाटते? हातभर फाटते हा शब्द अंडरलाईन आहे, कापायचा नाही” असं संजय राऊत म्हणाले.