Supriya Sule : ‘माझी अजितदादांना विनम्र वनंती आहे की…’ सुप्रिया सुळेंच दादांना भावनिक आवाहन

Supriya Sule : "कोणाची दादागिरी होते? गुंतवणूक येत नाहीय, हे कबूल केल्याबद्दल त्यांचे आभार मानते. याच्यामागे कोण आहे? कोण या कंत्राटदारांच्या मागे आहे. कोणाच्या दादागिरीमुळे पुण्यात गुंतवणूक येत नाहीय, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल" असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule : माझी अजितदादांना विनम्र वनंती आहे की... सुप्रिया सुळेंच दादांना भावनिक आवाहन
supriya sule and ajit pawar and sharad pawar
| Updated on: Aug 02, 2025 | 12:47 PM

“महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने क्राइम वाढतोय. त्यात पुणे जिल्हा आहे. जी पुण्यात परिस्थिती आहे, तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाहीय. वर्दीची भिती राहिलेली नाही. कोण आहे त्यांच्यामागे? सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत. असे अनेक मुद्दे राज्यात आहेत” असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. “संसदेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा झालीय. आता बिहारमध्ये निवडणूक आयोग जे निर्णय घेतय. नाव कमी जास्त वाढवली जात आहेत. त्यात पारदर्शकता नाहीय असं सगळ्याचे पक्षाचे लोक बिहारमधले म्हणतात. बिहार निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अनेक प्रश्न उदभवले आहेत. त्यावर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी. कराभार पारदर्शक व्हावा. ही सशक्त लोकशाही आहे. हा देश कोणाच्या मनमानीने चालणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने हा देश चालणार” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, लाडकी बहिण योजनेत 4900 कोटींचा भ्रष्टाचार. एवढा मोठा जनादेश सरकारला मिळाला आहे. त्यांचे मंत्री आणि वाचाळवीर असतील. सत्ता आणि पैसा आल्यावर गाडी कशी चुकीच्या ट्रॅकवर जाते, याचं देशातलं सर्वात दुर्देवी उदहारण म्हणजे आजच महाराष्ट्रातल शासन” अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

तुम्ही काय कारवाई केली?

मुख्यमंत्र्यांनी म्हटलय पुण्यात दादागिरी वाढली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना वाटत असेल पुण्यात दादागिरी होतेय, त्यामुळे पुण्यात गुंतवणूक येणार नाही, तर मला मुख्यमंत्र्यांना विचारायाचय तुम्ही काय कारवाई केली?. तुम्हाला माहितीय इथे दादागिरी होतेय, गुंतवणूक येत नाहीय, याला जबाबदार कोण? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राहुल कुल यांच्यासोबत राजकीय मतभेद असतील, पण…

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये काल दोन गटात तणाव निर्माण झाला होता. त्यावर सुद्धा सुप्रिया सुळे बोलल्या. “ही दुर्देवी घटना आहे. दौंड एक सुसंस्कृत, संवेदनशील तालुका आहे. आमचं भाग्य आहे, आम्हाला दौंड तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या भागातील सगळ्या लोकांशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. काल मी स्थानिक आमदार राहुल कुल आणि एसपींशी बोलली. राहुल कुल यांच्यासोबत राजकीय मतभेद असतील, पण सशक्त लोकशाहीत चर्चा झाली पाहिजे. राहुल कुल आणि मी सविस्तर चर्चा केली. त्यांनी सहकार्याची भावना दाखवली. त्या बद्दल मी त्यांचे आभार मानते” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

असं मी म्हणत नाहीय, तिथला ग्राऊंड रिपोर्ट आहे”

“माझे तिथले सहकारी अप्पासाहेब पवार, सोहेलभाई खान तिथे जाऊन आले. कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक यांच्याशी घरगुती चर्चा झाली. आम्ही दौंडमध्ये गुण्यागोविंदाने राहतो. अनेक दशकं राहतोय. दौंडमध्ये असं कधी झालं नाही, होऊ देणार नाही. बाहेरुन येऊन आमच्या भागात कोणी गडबड करणार असेल तर त्याचा निषेध करते. पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ही पहिली वेळ नाहीय. तुमच्या लोकांना आवरा. दौंडमध्ये येऊन भाषण करुन गडबड करतात, असं मी म्हणत नाहीय, तिथला ग्राऊंड रिपोर्ट आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तर त्यांना आवरा

“आदरणीय पवारसाहेबांना, मला अजितदादांना सुद्धा दौंडने खूप दिलय. माझी अजितदादांना विनम्र वनंती आहे, तुम्ही पालकमंत्री आहात. दौंडने तुम्हाला खूप प्रेम दिलय. आपल्या दौंड तालुक्यात असं काही होणार नाही. बाहेरुन येऊन लोक भडक भाषण करत असतील, टीकाटिप्पणी करत असतील, तर त्यांना आवरा” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.