MPSC Forest Service Main Exam Result : वन सेवा मुख्य परीक्षेते मागासवर्गीयातून वैभव दिघे तर महिला वर्गातून पूजा पानसरे अव्वल; निकाल वाचा एका क्लिकवर

| Updated on: Dec 17, 2021 | 9:05 PM

(MPSC Forest Service Main Exam Result) मुंबई: महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2019चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील वैभव सुरेश दिघे राज्यातून मागासवर्गीयातून पहिला आला आहे. तर पुणे जिल्ह्यातील पूजा भाऊसाहेब पानसरे ही महिला वर्गातून पहिली आली आहे.

MPSC Forest Service Main Exam Result : वन सेवा मुख्य परीक्षेते मागासवर्गीयातून वैभव दिघे तर महिला वर्गातून पूजा पानसरे अव्वल; निकाल वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2019चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील वैभव सुरेश दिघे राज्यातून मागासवर्गीयातून पहिला आला आहे. तर पुणे जिल्ह्यातील पूजा भाऊसाहेब पानसरे ही महिला वर्गातून पहिली आली आहे. निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थलावर जाहीर करण्यात आला आहे. त्यात जे निकाल काही कारणास्तव राखून ठेवले आहेत. यासंदर्भातही सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

100 पदांवरील भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर

एमपीएससी आयोगाडून वनविभागाच्या 100 पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. 15 सप्टेंबरला घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आली माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे. या परीक्षेत अहमदनगरमधील वैभव सुरेश दिघे प्रथम आला आहे, तर पुण्यातील पुजा भाऊसाहेब पानसरेने मुलींमध्ये बाजी मारली आहे. तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यात गुणांची यादीही वर्गनिहाय प्रसिद्ध केली आहे. वनक्षेत्रपाल, गट-ब संवर्गाच्या अनुसूचित जमाती महिला वर्गवारीतील एका पदाचा निकाल न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राखून ठेवण्यात आला असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

गुण पडताळणीसाठी प्रत्येकाला 10 दिवसांचा वेळ

ज्या उमेदवारंना उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांच्यासाठीही आयोगाकडून वेळ देण्यात आला आहे. आयोगाने अशा विद्यार्थ्यांना दहा दिवसांचा वेळ दिला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गुणांची पडताळणीही पाहता येणार आहे. या निकालानंतर वनविभागाच्या निवड झालेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा निकाल अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा आहे. लवकरच या उमेदवारांना प्रशिक्षण आणि नियुक्त्याही मिळण्याची शक्यता आहे.

John Abraham : ‘मी मोठ्या पडद्यावरचा हिरो, ओटीटीची कल्पनाही नाही करू शकत’

Ram Shinde | कर्जतचं राजकारण तापलं! उमेदवारांना धमकावलं जात असल्याचा राम शिंदेचा आरोप

Nagpur : नागपुरात नितीन गडकरींच्या स्टेजवर संजय दत्त म्हणाला कैसे है मामू..?